घर बांधकामाला बसली महागाईची झळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:36 IST2021-02-24T04:36:49+5:302021-02-24T04:36:49+5:30

भंडारा जिल्ह्यात रियल इस्टेटचा मोठा कारभार आहे. परंतु जीएसटी आणि नोटाबंदीनंतर या क्षेत्रात मंदी जाणवली. हळूहळू स्थिती पूर्वपदावर आली ...

Inflation hit home construction | घर बांधकामाला बसली महागाईची झळ

घर बांधकामाला बसली महागाईची झळ

भंडारा जिल्ह्यात रियल इस्टेटचा मोठा कारभार आहे. परंतु जीएसटी आणि नोटाबंदीनंतर या क्षेत्रात मंदी जाणवली. हळूहळू स्थिती पूर्वपदावर आली असतानाच १० महिन्यांपूर्वी कोरोना संसर्गामुळे या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात मंदी जाणवली. अनेक ठिकाणचे बांधकाम बंद झाले. घरकुल बांधकामासह सार्वजनिक ठिकाणी होत असलेले बांधकामही मोठ्या प्रमाणात प्रभावित झाले. परिणामी बांधकाम साहित्यही तसेच पडून होते. लाॅकडाऊनपूर्वी असलेल्या बांधकाम साहित्याच्या दरात आता वाढ झाली आहे. वाळू, विटा, स्टील आणि सिमेंटच्या भावात वाढ झाल्याने अनेकांचे घर बांधकामाचे बजेट वाढले आहे. दुसरीकडे मजुरीतही किंचित वाढ झाल्याचे दिसून येते. मात्र अनेकांचे बांधकाम कंत्राट स्वरूपात असल्याने त्याचा एवढा परिणाम दिसून येत नाही. एकंदरीत बांधकाम साहित्याच्या झालेल्या दरातील वाढीमुळे बांधकाम महागले, असे म्हणता येईल. भंडारा जिल्ह्यात वाळूचा व्यवसाय चांगलाच फोफावला आहे.

Web Title: Inflation hit home construction