लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : निसर्गाच्या वक्रदृष्टीने यावर्षी शेतकरी घायाळ झाला आहे. आता उच्च प्रतीच्या धानाचे पिक लोंबीत असतानाच शेतशिवारातील बांध्यातील धान गोलाकार अवस्थेत तयार झाले आहे. उभे धानपिक रोगराईमुळे जळल्यागत झाले आहे. उच्च प्रतीच्या धानाचे पिक यावर्षी शेतकऱ्यांच्या हातात येणार की नाही? अशी परिस्थिती जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर आली आहे. भंडारा जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करण्यात यावे, अशी मागणी जिल्हा परिषदेचे आरोग्य व बांधकाम सभापती प्रेम वनवे व सदस्य निलकंठ कायते यांनी केली आहे.भंडारा जिल्ह्यात सर्वाधिक धानाचे पिक घेतल्या जाते. त्यामुळे हलक्या व उच्चप्रतीच्या धानाचे पिक शेतकरी घेत असतात. परंतु या दोन्ही धानाच्या पिकावर विविध प्रकारच्या रोगराईचे सावट निर्माण झाले आहे. आता उभे धानातील शेतपिक तुडतुडा, सावदेवी, गाद, गादमाशी व विविध रोगांनी घेरल्यामुळे धानाच्या बांध्यातील शेतात गोलाकार होवून बुंध्यापासून शेंड्यापर्यंत धानाचे तणीस होताना दिसायला लागली आहे. अनेक ठिकाणी शेतकºयांना प्रकल्पाचे व नहराचे पाणी मिळते. पण ते पाणी एकदा मिळावे, त्यामुळे या परिसरातील सर्वाधिक शेतकरी उच्चप्रतीच्या धानाचे पिक लावतात. तर काही शेतकरी हलक्या धानाचे धानपिक घेत आहेत. परंतु या परिसरात सुद्धा धानपिकावर तुडतुडा, गादमाशी अशा व विविध प्रकारचा रोगराईचा प्रसार झाला आहे. शेतकऱ्यांनी धानाची रोवणी केल्यापासून आतापर्यंत तीन ते चार वेळा किटकनाशकांची फवारणी केली आहे. एका एकरसाठी एकवेळ औषधी फवारणी करण्याचा खर्च चार ते पाच हजार रुपयाचा येत असतो. रोवणी पासून मळणीपर्यंत येणारा खर्च पाहून जाता या परिसरातील शेतकºयाच्या हातात काहीच येण्याची चिन्हे दिसत नाही. यावर्षीच शेतकऱ्यावर निसर्ग चांगलाच कोपला आहे. आता हलके धान कापणीला सुरवात झाली आहेत. परंतु धानाच्या लोंब्या काही प्रमाणात पांढऱ्या दिसत आहेत. त्यामुळे हलके धानपिकाचेही उत्पादन मोठी घट निर्माण होत आहे. तसेच उच्चप्रतीचे धानपिक आता लोंब्यांवर आहे. परंतु रोगराईच्या प्रादुर्भावामुळे धानपिक जर्जर झाले आहेत. विविध प्रकारची औषधीची फवारणी करूनही धानावरील प्रादुर्भाव कमी होत नाही. त्यामुळे या वर्षी शेतकºयाच्या हातात धानपिक येणार की नाही, असा प्रश्नचिन्ह शेतकऱ्यांना पडला आहे. भंडारा जिल्ह्यातील हजारो हेक्टरवरील धानपिकावर रोगाचा प्रादुर्भाव असल्यामुळे उत्पन्नात मोठी घट होणार आहे.
धान पिकावर तुडतुड्यासह विविध रोगांचा प्रादुर्भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2018 22:51 IST
निसर्गाच्या वक्रदृष्टीने यावर्षी शेतकरी घायाळ झाला आहे. आता उच्च प्रतीच्या धानाचे पिक लोंबीत असतानाच शेतशिवारातील बांध्यातील धान गोलाकार अवस्थेत तयार झाले आहे.
धान पिकावर तुडतुड्यासह विविध रोगांचा प्रादुर्भाव
ठळक मुद्देजिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करा : प्रेम वनवे, निलकंठ कायते यांची मागणी, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन