देशीदारु दुकानाला सील ठोकले
By Admin | Updated: November 6, 2014 01:01 IST2014-11-06T01:01:05+5:302014-11-06T01:01:05+5:30
नगर परिषदेने भाडेतत्वावर देशी दारु दुकान दिले होते. सदर दुकान रिकामे करण्याची विनंती केल्यावरही ती धूडकावून लावणाऱ्या दुकानाला शेवटी नगरपरिषदेने सील ठोकले.

देशीदारु दुकानाला सील ठोकले
तुमसर : नगर परिषदेने भाडेतत्वावर देशी दारु दुकान दिले होते. सदर दुकान रिकामे करण्याची विनंती केल्यावरही ती धूडकावून लावणाऱ्या दुकानाला शेवटी नगरपरिषदेने सील ठोकले.
गोंदियाचे खेमचंद जेठानी यांनी सन २००१ मध्ये तीन वर्षाकरिता न.प. कडून भाडेतत्त्वावर पाच गाळे घेतले होते. परंतु त्यांनी हे गाळे देशी दारु परवाना असणाऱ्या नशिने यांना भाड्यो दिल्या होत्या. येथे नियमबाहयपणे राजरोसपणे हा सर्व व्यवहार सुरु होता. अनेकांनी हे दुकान बंद करण्याची मागणी नगरपरिषद प्रशासनाला केली होती. नगरपरिषदेने संबंधित दुकानदाराला गाळे रिकामे करण्याची अनेकदा विनंती केली, परंतु दुकानदाराने लक्ष दिले नाही. शेवटी ११ डिसेंबर २०१३ च्या आमसभेत सदर दुकान बंद करण्याचा ठराव घेण्यात आले. याबाबत नगर परिषदेने रितसर नोटीस संबंधित दुकानदाराला पाठविले होते. याकडे दुकानदाराने दुर्लक्ष केले.दुकानदाराने २ आॅगस्ट २०१४ ला यासंदर्भात न्यायालयात दाद मागितली. परंतु न्यायालयाने त्याचा अर्ज रद्द केला. नगर परिषदेने पुन्हा ७ आॅगस्टला दुकानदाराला नोटीस देवून गाळे रिकामे करण्यास सांगितले. संबंधित दुकानदाराने नगरपरिषदेच्या आदेशाला केराची टोपली दाखवून दुकान सुरुच ठेवले. दि. २८ सप्टेंबरला मुख्याधिकारी ए. आर. सातपुते, नगराध्यक्ष अभिषेक कारेमोरे, नगरसेवक आशिष कुकडे, नगरसेवक सलाम, श्याम धुर्वे, अॅड. विवेक स्वामी, संदीप पेठे, सचिन गायधने यांच्या समक्ष पाचही गाळ्यांना सील ठोकण्यात आले.संबंधित दुकानदाराने सात ते आठ वर्षापासून नगरपरिषदेला भाडे दिले नाही अशी माहिती असून याव्यतिरिक्त शहरात सुमारे २० ते २२ दुकानदारांनीही नगरपरिषदेला अनेक वर्षापासून भाडे दिले नाही. येथे नगरपरिषदेने कर्तव्याबरोबर कार्यक्षम प्रशासनाकडे लक्ष देण्याची गरज आहे. (तालुका प्रतिनिधी)