शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

१४ वर्षांनंतर भंडारा जंगलात दिसला 'इंडियन ग्रे वुल्फ'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2025 12:20 IST

Bhandara : वनक्षेत्रात आढळली भारतीय लांडग्याची दुर्मीळ प्रजाती

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : तब्बल १४ वर्षांच्या खंडानंतर भंडारा वनविभागाच्या रावणवाडी परिसरात 'इंडियन ग्रे वुल्फ' म्हणजेच भारतीय लांडगा आढळला आहे. लुप्तप्राय होत चाललेला हा लांडगा पुन्हा एकदा भंडारा परिसरात दिसल्याने वन्यजीव अभ्यासक, छायाचित्रकार आणि स्थानिक नागरिकांमध्ये उत्सुकता आणि खळबळ दोन्ही निर्माण झाली आहे. रविवारी सकाळी वाइल्ड वॉच फाउंडेशनचे सदस्य असलेले वाइल्डलाइफ फोटोग्राफर विवेक हुरा यांना रावणवाडी येथील एका शेताजवळ हा लांडगा दिसला. यामुळे भंडारा परिसरात लांडग्यांच्या संभाव्य वास्तव्याबाबत चर्चा सुरू झाली आहे.

विवेक हुरा यांच्या मते, लांडग्यांची संख्या, विचरण आणि त्यांच्या पर्यावरणीय भूमिकेबाबत अधिक सखोल अभ्यासाची गरज आहे. भंडारा वनक्षेत्रात लांडग्यांची उपस्थिती ही त्यांच्या अधिवासाच्या विस्ताराचे द्योतक असू शकते; पण यासाठी अधिक सखोल अभ्यास आवश्यक आहे. वाइल्ड वॉच फाउंडेशनमार्फत हा रेकॉर्ड आणि जीपीएस लोकेशन डब्ल्यूडब्ल्यूएफ व वन्यजीव संस्था, देहरादून यांच्याशी शेअर केला जाईल, असे त्यांनी सांगितले.

२०१२ मध्ये एफडीसीएमच्या सोनेगाव वन क्षेत्रात वाइल्ड वॉच फाउंडेशनचेच सदस्य नरेंद्र गुर्जर, शैलेंद्र राजपूत, नदीम खान आणि सर्वेश दीपक चड्डा यांनी दोन लांडगे पाहिले होते. या भागात भारतीय लांडगा तब्बल १४ वर्षांनंतर आढळला आहे. भंडारा वनक्षेत्रात त्याच्या अस्तित्वाचे हे संकेत मानले जात आहेत.

गंभीर संकटग्रस्त' श्रेणीतभारतीय लांडगा 'गंभीर संकटग्रस्त' या श्रेणीत असून, तो मुख्यत्वे मध्य भारतातील काही ठिकाणीच आढळतो. या प्रजातीची संख्या कमी होत चालली आहे. महाराष्ट्रातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमधील अर्थ-सदाहरित जंगलांमध्येही या लांडग्यांचे अस्तित्व असल्याचे रामसर साइटच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

"ही फार महत्त्वाची नोंद आहे. या नव्या माहितीच्या आधारे वनविभागाने परिसरात निगराणी वाढवण्याची आणि सविस्तर सर्वेक्षण करण्याची योजना आखली आहे. या संकटग्रस्त प्रजातीचे संरक्षण सुनिश्चित करण्यासाठी स्थानिकस्तरावर पावले उचलली जातील."- राहुल गवई, उपवनसंरक्षक, भंडारा 

टॅग्स :bhandara-acभंडारा