स्वतंत्र विदर्भ काळाची गरज

By Admin | Updated: January 21, 2016 00:50 IST2016-01-21T00:50:15+5:302016-01-21T00:50:15+5:30

गौरवसंपन्न इतिहास असलेल्या विदर्भाची उपेक्षा सातत्याने होत आली आहे. वेगळा विदर्भ राज्य स्थापनेची मागणी ही काल परवाची नसून फार जुनी आहे.

Independent Vidarbha Time Need | स्वतंत्र विदर्भ काळाची गरज

स्वतंत्र विदर्भ काळाची गरज

पत्रपरिषद : राजकुमार तिरपुडे यांनी स्थापन केला विदर्भ माझा पक्ष
भंडारा : गौरवसंपन्न इतिहास असलेल्या विदर्भाची उपेक्षा सातत्याने होत आली आहे. वेगळा विदर्भ राज्य स्थापनेची मागणी ही काल परवाची नसून फार जुनी आहे. नागपुराला उपराजधानीचा दर्जा देऊन नेहमी विदर्भाची उपेक्षा करण्यात आली आहे. वेगळ्या विदर्भासाठी जनमानसात जावून राजकीयदृष्ट्या या मागणीला बळ मिळाले पाहिजे, अशी माहिती विदर्भ माझा पक्षाचे संस्थापक राजकुमार तिरपुडे यांनी दिली.
येथील विश्रामगृहात दुपारी २ वाजता आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी डॉ.गोविंद वर्मा, मंगेश तेलंग, सुरेश राऊत आदी उपस्थित होते. तिरपुडे म्हणाले भारताच्या हृदयस्थानी असलेला विदर्भ परिसर पौराणिक, ऐतिहासिक, राजकीय व व्यवसायीक महत्व असलेला एक गौरवसंपन्न आहे. १९५६ साली राज्य पुनर्वसनेत मध्यप्रांताची राजधानी असलेल्या नागपूर शहराचे राजधानीचे स्वरुप बदलवून द्विभाषिक राज्यात विदर्भाला सामील करण्यात आले. १ मे १९६० रोजी नवनिर्मित राज्य महाराष्ट्रामध्ये नागपूर व विदर्भाचा समावेश करून नागपुरला उपराजधानीचे दुय्यम स्वरुप प्राप्त झाले. मध्यप्रांताची राजधानी ते महाराष्ट्र राज्याची उपराजधानी या आजवरच्या विदर्भाच्या विकासाच्या प्रवासाचा अभ्यास केल्यास पश्चिम महाराष्ट्रापेक्षा विदर्भाच्या वाटी सातत्याने उपेक्षा आली. आजघडीला १ लाख ५० हजार कोटींच्या घरात अनुशेष असून तो कधीही भरून न निघणारा आहे. राज्याचे प्रथम उपमुख्यमंत्री स्व.नाशिकराव तिरपुडे यांनी विदर्भ विकास महासभेची स्थापना करून १९८० मध्ये सर्वप्रथम विदर्भाचा अनुशेष ४० हजार कोटी असल्याची माहिती दिली होती. तसेच विदर्भ राज्य समन्वय समितीच्या माध्यमाने स्वतंत्र विदर्भासाठी मागणी रेटून धरली होती. शेतकरी आत्महत्या, उद्योग, व्यापार, आरोग्य, शिक्षण क्षेत्रात विदर्भ पिछाडीवर आहे. त्यामुळे वेगळे विदर्भराज्य या आश्वासनावर भाजपने विदर्भात यश मिळविले. परंतु या घडीला ते आश्वासन पक्ष विसरलेला आहे. परिणामी विदर्भ राज्य मिळाल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. असा इशाराही तिरपुडे यांनी दिला. (प्रतिनिधी)
संगणक परिचालकांची कुचंबणा
भंडारा : ग्रामपंचायतीतील संगणक परिचालकांचा महाआॅनलाईनसोबत असलेला करार संपुष्टात आल्याने त्यांची कुचंबणा होत आहे. या परिचालकांनी हिवाळी अधिवेशनादरम्यान नागपुरात आंदोलन केले असता त्यांच्यावर लाठीमार झाला होता. (प्रतिनिधी)

Web Title: Independent Vidarbha Time Need

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.