महाराष्ट्रदिनी फडकणार स्वतंत्र विदर्भाचा ध्वज !

By Admin | Updated: April 30, 2016 00:33 IST2016-04-30T00:33:37+5:302016-04-30T00:33:37+5:30

वेगळ्या विदर्भाच्या आंदोलनात अ‍ॅड श्रीहरी अणे यांच्या सक्रियतेनंतर विदर्भात आंदोलने व जनजागृती सभा घेतल्या गेल्या त्यात प्रचंड लोकसहभागी झाले.

Independent Vidarbha flag is going on in Maharashtra! | महाराष्ट्रदिनी फडकणार स्वतंत्र विदर्भाचा ध्वज !

महाराष्ट्रदिनी फडकणार स्वतंत्र विदर्भाचा ध्वज !

सर्वपक्षीय एकत्र : भाजपच्या ‘त्या’ घोषणापत्राची होळी करणार
भंडारा : वेगळ्या विदर्भाच्या आंदोलनात अ‍ॅड श्रीहरी अणे यांच्या सक्रियतेनंतर विदर्भात आंदोलने व जनजागृती सभा घेतल्या गेल्या त्यात प्रचंड लोकसहभागी झाले.
भंडारा विदर्भ राज्य आघाडी व विदर्भ राज्य आंदोलन समिती द्वारा घोषित आंदोलनानुसार १ मे रोजी भंडाऱ्यात त्रिमूर्ती चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर विदर्भाचा झेंडा फडकविण्यात येणार आहे. सकाळी ८ वाजता भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करण्यात येईल. विदर्भवादी काळी फिती लावून महाराष्ट्रदिनाचा निषेध करुन वेगळ्या विदर्भाच्या घोषणा देऊन भाजपा च्या जाहिरनाम्याची होळी करण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय महाराष्ट्रदिनी भंडाऱ्यात पालकमंत्र्यांना काळे झेंडे दाखवून निषेध करण्यात येणार असल्याचे मधुकर कुकडे यांनी सांगितले.
वेगळ्या विदर्भ राज्याला विविध राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, व्यापारी, शिक्षक, विद्यार्थी, डॉक्टर, वकील यांच्यासह अन्य संघटनांच्या विदर्भवादी संघटनांनी व कार्यकर्त्यांनी समर्थन दिले आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार मधुकर कुकडे, काँग्रेसचे माजी आमदार अ‍ॅड.आनंदराव वंजारी, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे, नगरसेवक महेंद्र निंबार्ते, भाजपाचे महामंत्री भरत खंडाईत, विहीपचे संजय एकापुरे, डॉ.गोविंद कोडवाणी, नगरसेवक हिवराज उके, संजय सतदेवे, भाकपचे सदानंद इलमे, अ‍ॅड. पद्माकर टेंभुर्णीकर, अर्जुन सूर्यवंशी, दामोधर क्षीरसागर, अरुण भेदे, विजय दुबे, अविनाश पनके, रमाकांत पाशिने, तुषार हट्टेवार, अरुण लांजेवार, शशांक जोशी, सामाजिक कार्यकर्ते दुर्वास धार्मिक, बाबा पाटेकर, कलाम शेख, भास्कर कडव, पुष्पराज कडुकार, भीमराव टेंभूर्ने, अरविंद ढोमणे, तुळशीराम गेडाम, प्रमोद धार्मिक, रोशन काटेखाये, धनंजय सपकाळ, विलास सुदामे, नितीन तुमाने, बबलू कोहाड, चंद्रशेखर टेंभूर्णे, संजय पटले यांनी केले आहे. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: Independent Vidarbha flag is going on in Maharashtra!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.