अपक्ष उमेदवारांना मिळाली केवळ ३.९२ टक्केच मते

By Admin | Updated: May 20, 2014 23:25 IST2014-05-20T23:25:36+5:302014-05-20T23:25:36+5:30

भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात भाग्य आजमाविलेल्या ११ अपक्ष उमेदवारांच्या मतांची बेरीज केवळ अडीच टक्के ईतकी आहे. त्यांना ४६ हजार ९९५ मते मिळाली आहे.

Independent candidates got only 3.9 2 percent votes | अपक्ष उमेदवारांना मिळाली केवळ ३.९२ टक्केच मते

अपक्ष उमेदवारांना मिळाली केवळ ३.९२ टक्केच मते

भंडारा : भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात भाग्य आजमाविलेल्या ११ अपक्ष उमेदवारांच्या मतांची बेरीज केवळ अडीच टक्के ईतकी आहे. त्यांना ४६ हजार ९९५ मते मिळाली आहे. एकही अपक्ष उमेदवार या निवडणुकीत प्रभाव पाडू शकला नाही. प्रमुख पक्ष वगळता अन्य पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढलेल्या १३ उमेदवारांच्या मतांची टक्केवारी ६.९४ ईतकी असून त्यांना ८३ हजार १६५ मते मिळाली आहेत. भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात २६ उमेदवार रिंगणात होते. त्यात भाजप आणि राष्ट्रवादी या प्रमुख पक्षासह १५ अन्य पक्ष तर ११ अपक्ष उमेदवारांचा समावेश होता. ११ लाख ९७ हजार ३९८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्या भाजपाचे नाना पटोले हे सहा लाख ०६ हजार १२९ मते घेऊन विजयी झाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफुल पटेल यांना चार लाख ५६ हजार ८७५ मते मिळाली. या दोघांच्या एकत्र मतांची बेरीज केली तर ती १० लाख ६३ हजार ००४ ईतकी म्हणजे ८९.०१ टक्के होते. या थेट लढतीत अन्य पक्षाचे उमेदवार प्रभाव पाडू शकले नाही. अपक्ष ११ उमेदवारांना केवळ अडीच टक्के मते मिळाली. यात मोरेश्वर मेश्राम यांना १०,११०, मनोहर मते यांना १,३८०, ईश्वर नंदागवळी यांना ५,९४१, सुषमा नागपुरे यांना १,४७९, बकाराम चोले यांना ४,४१७, वर्षा तिडके यांना ६११, धनंजय राजाभोज यांना ६,१२५, वाहेदबेग मिर्जा यांना ८९९, जितेंद्र बांते यांना १,७३२, विशाल भोयर यांना ४,१६८, धानू वलथरे यांना १०,१३३ मते मिळाली. बहुजन समाज पार्टी, आम आदमी पार्टी, समाजवादी पार्टी, आंबेडकर राईट पार्टी, ओबीसी एनटी पार्टी, बहुजन मुक्ती पार्टी, गोंडवाना गणतंत्र पार्टी, सर्वधर्म समाज पार्टी, आंबेडकर समाज पार्टी, भारतीय मानवता पक्ष, भारिप-बहुजन महासंघ, लोकअधिकार संघर्ष समिती, मायनारीटीज डेमोक्रेटिक पार्टी या पक्षांनी आपले उमेदवार रिंगणात उतरविले होते. यासर्व उमेदवारांना ८३ हजार १६५ मते मिळाली. त्यांच्या मतांची टक्केवारी ६.९४ ईतकी आहे. या पक्षाचे उमेदवारही निवडणुकीत प्रभाव दाखवू शकले नाही. विशेष म्हणजे नकाराधिकार वापरणारे चार हजार ३२ मतदारांनी २६ पैकी एकाही उमेदवाराला पसंत केले नाही. झालेल्या मतदानाच्या पाव टक्के नकाराधिकाराचा वापर करणारी मते आहेत. उमेदवारी दाखल करताना मतांचे गणित मांडणार्‍या अपक्ष आणि पक्षांच्याही उमेदवाराला मतदारांनी त्यांची जागा दाखवून दिल्याचे निकालाअंती दिसून आले आहे. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: Independent candidates got only 3.9 2 percent votes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.