मोखारा प्राथमिक शाळेत स्वातंत्र्य दिन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:41 IST2021-08-18T04:41:48+5:302021-08-18T04:41:48+5:30
भंडारा : मोखारा येथील जिल्हा परिषद शाळेत शाळा समितीचे सदस्य गिरीष नखाते यांच्या हस्ते, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष ...

मोखारा प्राथमिक शाळेत स्वातंत्र्य दिन
भंडारा : मोखारा येथील जिल्हा परिषद शाळेत शाळा समितीचे सदस्य गिरीष नखाते यांच्या हस्ते, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष राजू काटेखाये, सरपंच प्रिती जितेंद्र नखाते, उपरपंच रामेश्वर नखाते, पोलीस पाटील संपत नखाते, मेघश्याम गिर्हेपुंजे, तंटामुक्त समिती अध्यक्ष, सर्व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, सर्व ग्रामपंचायत सदस्य, मुख्याध्यापक मेश्राम, सहायक शिक्षिका गभने, शाळेतील विद्यार्थी व ग्रामवासीयांच्या उपस्थितीत ध्वजारोहण पार पडले. त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेत मागील नऊ वर्षे सेवा देणाऱ्या कुंदा वाहाने यांचा सेवानिवृत्तीपर सत्कार करण्यात आला. तसेच त्यांच्या हस्ते दरवर्षी मोखारा गावात वर्ग १ ते पदवीधारकपर्यंत प्रावीण्य प्राप्त विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या ग्रामविद्या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. प्रास्ताविक मेश्राम यांनी केले तर आभार गभने यांनी मानले.