शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्‍हारी नौकरी खाऊंगी..."; मुख्यमंत्री निवासस्थानातील स्वाती मालिवाल यांचा धक्कादायक व्हिडीओ समोर
2
'2029 मध्ये कोण होणार भारताचा पंतप्रधान? PM मोदींसंदर्भात राजनाथ सिंहांचं मोठं विधान; केला असा दावा
3
अरविंद केजरीवाल कधीही भाजपासोबत जातील; BJP च्या जुन्या मित्राचा दावा, काँग्रेसचाही आरोप
4
बोर्ड परीक्षेत ९९.७०% मिळवणाऱ्या १६ वर्षीय तरूणीचा मृत्यू; कुटुंबीयांनी दाखवली माणुसकी
5
AI मुळे नोकऱ्यांवर संकट येणार का? नारायण मूर्तींनीं सांगितलं काय होणार परिणाम, जाणून घ्या
6
बापरे! AstraZeneca च्या अडचणीत वाढ; आणखी एका धोकादायक आजाराचं कारण बनली कोविशील्ड
7
रोहित, हार्दिक यांना Mumbai Indians संघात ठेवणार नाही, तर... ; वीरेंद्र सेहवागचा दावा
8
"मला एका मोठ्या पक्षाकडून लोकसभेची ऑफर होती, पण...", किरण मानेंचा गौप्यस्फोट
9
Mahindra & Mahindra च्या शेअरवर गुंतवणूकदार तुटून पडले; एक्सपर्ट म्हणाले, "₹२९०० पर्यंत..."
10
बाहुबलीच्या आयुष्यात होणार देवसेनाची एन्ट्री?; प्रभासची क्रिप्टिक पोस्ट चर्चेत
11
३.५ किलो वजन, १२०० रुपये किंमत, या दुर्मीळ आंब्याची उरलीत केवळ १० झाडं, मध्य प्रदेश सरकार चिंतीत 
12
...तेव्हापासून संजय राऊत पिसाळलेत; राज ठाकरेंवरील टीकेवरून मनसेचा खोचक पलटवार
13
T20 World Cup कोण जिंकणार? जय शाह यांनी सांगितली ४ नावं, पाकिस्तानला डच्चू
14
ईडीने जप्त केलेले पैसे लोकांना वाटणार? मोदी म्हणाले,"कायद्यात बदल करुन मी..."
15
Arvind Kejriwal : "मी 4 जूनला जेलमध्ये असेन, TV पाहत असताना..."; अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
16
३ राशींची साडेसाती: कधी होईल मुक्तता? ‘हे’ उपाय करुन पाहा, शनीदेवाची कृपा मिळवा
17
IPO प्राईजच्या ५ पट झाला 'हा' शेअर, जबरदस्त नफ्यानंतर विक्रमी उच्चांकाच्या जवळ स्टॉक 
18
SC, ST, OBC आरक्षणाचा सर्वात मोठा समर्थक कोण? अमित शाह यांनी स्पष्टच सांगितलं, उत्तर-दक्षिण विभाजनावरही बोलले
19
३ राजयोग, दुप्पट लाभ: ७ राशींना शुभ फलदायी, नोकरीत प्रगती; धनलाभ योग, उत्तम अनुकूल काळ!
20
" त्याला कोरोना झाला आणि तोपण गेला...", जिवंतपणीच भूषण कडूला लोकांनी घोषित केलं होतं मृत

प्रकल्पग्रस्तांना मिळणार वाढीव मोबदला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2019 9:42 PM

गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांना शेतजमिनीचा वाढीव मोबदला तात्काळ देण्यात यावा, कोणवरही अन्याय होणार नाही यांची काळजी संबंधित अधिकाऱ्यांनी घ्यावी. काही अडचणी असल्यास त्याचा शासनस्तरावर तोडगा काढण्यात येईल, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.

ठळक मुद्देचंद्रशेखर बावनकुळे : जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा विकास कामांचा आढावा

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांना शेतजमिनीचा वाढीव मोबदला तात्काळ देण्यात यावा, कोणवरही अन्याय होणार नाही यांची काळजी संबंधित अधिकाऱ्यांनी घ्यावी. काही अडचणी असल्यास त्याचा शासनस्तरावर तोडगा काढण्यात येईल, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.जिल्ह्यातील विविध विकास कामांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचे आयोजन पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते.या बैठकीस आमदार चरण वाघमारे, बाळा काशीवार, अ‍ॅड. रामचंद्र अवसरे, म्हाडाचे अध्यक्ष तारिक कुरेशी जिल्हाधिकारी शांतनू गोयल, मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र जगताप, सहाय्यक जिल्हाधिकारी श्रीकृष्णनाथ पांचाळ, निवासी उपजिल्हाधिकारी विजय भाकरे, नगराध्यक्ष सुनील मेंढे, नगराध्यक्ष प्रदीप पडोळे, विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता कांबळे तसेच विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.पालकमंत्री म्हणाले, गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांना शेतजमिनीचा वाढीव मोबदला देण्यासाठी सकारात्मक दृष्टीकोनातून प्लॉट वाटप करा तसेच वाढीव अनुदानची मागणी आहे. भंडारा शहरातील दुकानदारांना दुकान गाळे वाटप करण्याकरीता जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन प्रस्ताव सादर करावा. त्यावर लवकरात लवकर निर्णय घेण्यात येईल. चिखली हमेशा राजेगाव प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने त्यावर अभ्यासपूर्ण प्रस्ताव प्रस्ताव सादर करावा, असे पालकमंत्र्यांनी सांगितले. वनजमिनीवरील अतिक्रमणाबाबत लवकरात लवकर कार्यवाही करावी अन्यथा संबंधितांना दादासाहेब गायकवाड स्वाभीमान योजनेअंतर्गत जागा देण्याची कार्यवाही करावी, असे त्यांनी सांगितले. बांबू कामगारांना बांबु पुरवठा करण्यासाठी तातडिने कार्यवाही करुन निपटारा करावा व बांबू पुरवठा करावा. वृध्द कलाकारांना मानधन देण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी १० दिवसात बैठक घेवून प्रकरणाचा निपटारा करावा. राष्ट्रीय पेयजल योजनेचे प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे. त्यावर लवकरात लवकर निर्णय घेण्यात येईल, असेही ते म्हणाले.गोबरवाही परिसरातील गावांना बावनथडी प्रकल्पापासून सिंचनाचे व पिण्याचे पाणी उपलब्ध करण्याकरीता सर्व गावांचे पाण्याचे स्त्रोत जोडावे. तसेच सर्व नळ योजना जिल्हा परिषदकडे वर्ग कराव्या. त्यासाठी लागणारा निधी उपलबध करुन देण्यात येईल, असे ते म्हणाले.भंडारा शहरातील अतिक्रमधारक दुकानदारांना मोकळया जागेवर बीओटी तत्वावर दुकान गाळे मिळवून देणे, चिखली हमेशा राजेगाव- एमआयडीसी येथील सरकारी जमिनीचा पट्टा पर्यावरण विकास आणि विपश्यना केंद्र बांबू कामगारांना बांबुचा पुरवठा, वृध्द कलाकारांना मानधन, राष्ट्रीय पेयजल योजनेचे प्रस्ताव, महिला वन कामगारांना नियमित काम, गोबरवाही परिसरातील गावांना बावनथडी प्रकल्पाग्रस्तांना सिंचनाचे व पिण्याचे पाणी उपलब्ध करणे, कलेवाडा अतिक्रमणधारकांना कायमस्वरुपी पट्टे, करचखेडा उपसा सिंचन योजनेचे पाणी देणे, आदिवासी समाजाच्या मागण्या, धमापूरी लघुकालव्याबाबत मोबदला, भोजापूर संपादित जागेचा मोबदला देणे, तुमसर नगरपरिषद क्षेत्रातील विविध विकास कामांचा मोबदला, बेरोडी येथील घराचा मोबदला आदींबाबतही पालकमंत्र्यांनी आढावा घेतला.