दहा रूपयांच्या भरमसाठ नाण्यांमुळे वाढली डोकेदुखी
By Admin | Updated: December 23, 2016 00:33 IST2016-12-23T00:33:35+5:302016-12-23T00:33:35+5:30
नोटबंदीनंतर शिक्केही बंद होणार या अफवेमुळे लोकांनी घरी साठवून ठेवलेले सिक्के बाहेर काढल्यामुळे बाजारात ...

दहा रूपयांच्या भरमसाठ नाण्यांमुळे वाढली डोकेदुखी
बँकेकडूनही स्वीकारण्यास नकार : अफवांमुळे नागरिकही झाले त्रस्त
मोहाडी : नोटबंदीनंतर शिक्केही बंद होणार या अफवेमुळे लोकांनी घरी साठवून ठेवलेले सिक्के बाहेर काढल्यामुळे बाजारात भरमसाठ सिक्क्यांची आवक झाली असून दहा व पाचच्या शिक्यांमुळे व्यापाऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे. दुकानात जमा झालेले सिक्के बँकसुध्दा घेण्यास नकार देत असल्याने एवढ्या मोठ्या प्रमाणात असलेल्या शिक्क्यांचे काय करावे, असा प्रश्न व्यापाऱ्यांना पडला आहे.
सरकारने अचानकपणे हजार व पाचशे नोटा चलनातून बंद केल्या ज्यामुळे सामान्य नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. आता दहा व पाचचे शिक्के सुध्दा बंद होणार अशी अफवा परिसरात पसरल्यामुळे ग्रामीण भागात पिग्मी बँक किंवा एखादया डब्ब्यात जमा करुन ठेवलेले पाच व दहाचे शिक्के नागरिकांनी बाहेर काढले. त्यामुळे बाजारातील व्यवहारात भरमसाठ शिक्के आले. १०० किंवा २०० रुपयांची वस्तु खरेदी साठीही दहाचे १० किंवा २० शिक्के नागरिक देत आहेत. ज्यामुळे त्यापाऱ्यांकडे हजारो रुपयांचे शिक्के गोळा झाले. मात्र तेवढ्या प्रमाणात ग्राहक हे शिक्के घेत नाही. काही नागरिक तर दुकानदरांकडून शिक्केच स्विकारतच नाही. शिक्के बंद झाले आहेत असे सांगतात. येथील पेट्रोल पंपावर तर शिक्के स्विकारण्यात येणार नाही असे बॅनरच लावले आहेत. मात्र यामुळे सर्व व्यापारी सोबतच नागरिक सुध्दा मोठे हैराण झाले आहेत. यावर तोडगा काढण्याची मागणी करण्यात आली आहे. (शहर प्रतिनिधी)