खरीप धानाच्या दरात प्रती क्विंटल ५३ रुपयांची वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2020 05:00 AM2020-10-02T05:00:00+5:302020-10-02T05:00:30+5:30

जिल्ह्यात सर्वाधिक १ लाख ९९ हजार हेक्टरवर यंदा धानाची लागवड करण्यात आली आहे. धान हेच या भागातील प्रमुख पीक आहे. त्यामुळे शेतकºयांना हमीभावापेक्षा कमी दर मिळू नये, खासगी व्यापाऱ्यांकडून त्यांची लूट होवू नये यासाठी जिल्ह्यात मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळातंर्गत धान खरेदी केली जाते.

An increase of Rs 53 per quintal in kharif grain prices | खरीप धानाच्या दरात प्रती क्विंटल ५३ रुपयांची वाढ

खरीप धानाच्या दरात प्रती क्विंटल ५३ रुपयांची वाढ

Next
ठळक मुद्देऑक्टोबरमध्ये सुरू होणार धान खरेदी : दरवाढ तुटपुंजीच, शेतकऱ्यांमध्ये नाराजी


लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी दर मिळू नये यासाठी शासकीय धान खरेदी केंद्राच्या माध्यमातून धान खरेदी केली जाते. २०२०-२१ च्या खरीप आणि रब्बी हंगामासाठी शासकीय धान खरेदीचे दर शासनाने निश्चित केले आहे. अ दर्जाच्या धानाला १८८८ रुपये, तर सर्वसाधारण धानाला १८६८ रुपये प्रति क्विंटल दर निश्चित केला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा केवळ धानाच्या दरात प्रति क्विंटल केवळ ५३ रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. ही वाढ फारच तुटपुंजी असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे.
जिल्ह्यात सर्वाधिक १ लाख ९९ हजार हेक्टरवर यंदा धानाची लागवड करण्यात आली आहे. धान हेच या भागातील प्रमुख पीक आहे. त्यामुळे शेतकºयांना हमीभावापेक्षा कमी दर मिळू नये, खासगी व्यापाऱ्यांकडून त्यांची लूट होवू नये यासाठी जिल्ह्यात मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळातंर्गत धान खरेदी केली जाते. गत खरीप आणि रब्बी हंगामात मार्केटिंग फेडरेशनने ५७ लाख क्विंटल धान खरेदी खरेदी केली होती. गतवर्षी सर्वसाधारण धानाला १८१५ आणि अ दर्जाच्या धानाला १८३५ रुपये दर शासनाने जाहीर केला होता. तर यंदा सर्वसाधारण धानाला १८६८ आणि अ दर्जाच्या १८८८ रुपये प्रति क्विंटल दर जाहीर केला आहे. मागील वर्षीच्या हमीभावाच्या तुलनेत यंदा सरासरी ५३ रुपये प्रति क्विंटल दरात वाढ झाली आहे. दरवर्षी धानाच्या एकरी लागवड खर्चात वाढ होत आहे. शेतकऱ्यांना प्रति एकर धान लागवडीचा २५ ते ३० हजार रुपये येतो. तर खते, बियाणे आणि मजुरीच्या दरात वाढ होत आहे. पण त्यातुलनेत दर मिळत नाही.
गतवर्षी महाविकास आघाडीने धानाला ७०० रुपये प्रति क्विंटल बोनस दिला होता. त्यामुळे शेतकºयांना थोडा दिलासा मिळाला होता. २५ ऑक्टोबरपासून जिल्ह्यात शासकीय धान खरेदीला सुरूवात होण्याची शक्यता आहे.

मक्का खरेदीचा दर निश्चित
जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव, सडक अर्जुनी तालुक्यात मक्का लागवड केली जात आहे. मक्का उत्पादक शेतकऱ्यांना योग्य हमीभाव मिळावा यासाठी शासनाने मक्का हमीभाव खरेदी केंद्र सुरू केले जाणार आहे. २०२०-२१ करिता मक्का खरेदीचे दर शासनाने निश्चित केले असून मक्याला १८५० रुपये प्रति क्विंटल हमीभाव जाहीर केला आहे.

Web Title: An increase of Rs 53 per quintal in kharif grain prices

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :agricultureशेती