आधारभूत धान खरेदी केंद्रावर धान मोजणीची मर्यादा वाढवा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2021 05:00 AM2021-12-01T05:00:00+5:302021-12-01T05:00:27+5:30

जिल्ह्यातील पालांदूर परिसरातील चुलबंद खोऱ्यातील शेतकरी प्रगतिशील शेती करतात. यात कृषी विभागाचे मार्गदर्शन मिळत आहे. साधारण धानाला वगळून संकरित धानाची शेती ६० टक्क्यांवर पोहोचलेली आहे. प्रतिएकर शेतकऱ्यांना किमान ३० क्विंटलपर्यंतचे उत्पन्न हाती आले आहे. नव्या तंत्राचा ध्यास घेत शेतकरी धान पिकाचे उत्पादन घेत आहेत. नवनव्या धान्याच्या प्रजाती भरघोस उत्पन्नाकरिता पालांदूर परिसरातील शेतकरी ख्यातनाम आहेत.

Increase paddy counting limit at basic grain procurement centers! | आधारभूत धान खरेदी केंद्रावर धान मोजणीची मर्यादा वाढवा!

आधारभूत धान खरेदी केंद्रावर धान मोजणीची मर्यादा वाढवा!

Next

मुखरू बागडे
लोकमत न्यूज नेटवर्क
पालांदूर : बहुप्रतिक्षित धान खरेदी केंद्रे पालांदूर परिसरात सुरू झाली आहेत. यात प्रतिएकर १२. ४० क्विंटल मोजणीची धान मर्यादा ठेवण्यात आली आहे. गतवर्षी १४.४० क्विंटल एवढी होती. दोन क्विंटलची घट झाल्याने चुलबंद खोऱ्यातील सिंचित शेतकरी संकटात सापडले आहेत. किमान गतवर्षी एवढी तरी मोजणीची मर्यादा अत्यावश्यक असल्याची शेतकऱ्यांनी मागणी केली आहे. 
जिल्ह्यातील पालांदूर परिसरातील चुलबंद खोऱ्यातील शेतकरी प्रगतिशील शेती करतात. यात कृषी विभागाचे मार्गदर्शन मिळत आहे. साधारण धानाला वगळून संकरित धानाची शेती ६० टक्क्यांवर पोहोचलेली आहे. प्रतिएकर शेतकऱ्यांना किमान ३० क्विंटलपर्यंतचे उत्पन्न हाती आले आहे. नव्या तंत्राचा ध्यास घेत शेतकरी धान पिकाचे उत्पादन घेत आहेत. नवनव्या धान्याच्या प्रजाती भरघोस उत्पन्नाकरिता पालांदूर परिसरातील शेतकरी ख्यातनाम आहेत. खासगीतील बीजोत्पादनातील धान कंपन्या पालांदूर परिसरात येत आहेत. चुलबंद खोरा असल्याने सुपीक जमीन हा सुमार उत्पादनाचा मुख्य आधार आहे. कृषी विभागाच्या प्रयत्नांनी व शेतकऱ्यांच्या मेहनतीने प्रतिएकरी २५ ते ३० हजार रुपयांचा खर्च प्रगतिशील शेतकरी करतो आहे. शासनाने ठरवून दिलेल्या दरानुसार एका एकराला लागणाऱ्या खर्चाचे सुद्धा धान खरेदी केंद्रावर खरेदी केले जात नाही. याचा विचार शासनाने करणे अत्यंत आवश्यक आहे. उत्पन्नातून हाती आलेल्या आकडेवारीचा अभ्यास घेत किमान १५ क्विंटल प्रति एकराची मर्यादा निर्धारित करणे काळाची गरज आहे. आधारभूत केंद्रावर सातबाराची क्षमता तपासूनच खरेदी सुरू आहे. क्षमतेपेक्षा जास्त झालेले धान शेतकऱ्याला परत केली जात आहेत. उर्वरित धानाचे करायचे काय असा प्रश्न शेतकऱ्यांना पडत आहे. लोकप्रतिनिधींनी शेतकऱ्यांना सहकार्य करण्याची गरज आहे.

पालांदूर येथे सेवा सहकारी संस्थेंतर्गत धान खरेदी सुरू झालेली आहे. जिल्हा पणन कार्यालयाच्या आदेशाने प्रती एकर १२.४० क्विंटलची मर्यादा आहे. कालपर्यंत सुमारे ११५० क्विंटलची धान खरेदी आटोपली आहे. धान खरेदीची प्रती एकर मर्यादा अत्यल्प असल्याची ओरड शेतकरी करीत आहेत; मात्र आमचे नियमाने हात बांधलेले आहेत. नियमानुसारच धान खरेदी सुरू आहे.
-प्रेमराज खंडाईत, ग्रेडर, पालांदूर.

माझी संपूर्ण शेती सिंचित आहे. यात अर्ध्याच्यावर संकरित धानाची लागवड केली होती. एकरी उत्पन्न २० क्विंटलच्या पुढे झाले आहे. तेव्हा जिल्हा पणन कार्यालयाने वास्तव परिस्थितीचा अभ्यास घेत आम्हा शेतकऱ्यांवर धान खरेदीची वजन मर्यादा वाढवून बळीराजाला सहकार्य करावे अशी मागणी आहे. 
-वीरेंद्र मदनकर, 
प्रगतिशील शेतकरी मऱ्हेगाव

 

Web Title: Increase paddy counting limit at basic grain procurement centers!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.