अवैध व्यवसायात वाढ
By Admin | Updated: March 15, 2016 01:51 IST2016-03-15T01:51:50+5:302016-03-15T01:51:50+5:30
राजकारण त्यातून गावाची खुंटलेली प्रगती. त्यातच राजरोस चालू असलेले दारु, सट्टा, जुगार, अवैध वाळू उत्खनन

अवैध व्यवसायात वाढ
साकोली : राजकारण त्यातून गावाची खुंटलेली प्रगती. त्यातच राजरोस चालू असलेले दारु, सट्टा, जुगार, अवैध वाळू उत्खनन यामुळे सानगडी हे गाव बेजार झाले आहे.
ऐतिहासिक वैभव या गावाला आजही आहे. सहानगड किल्ला त्याचे प्रतिक आहे. गावाला लागून टेकडीचा आधार घेऊन मोठा पाणी तलाव आहे.
महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेले हे गाव विणकरांच्या हाताला काम न मिळाल्याने हताश झाले आहे. विणकरांचे अनेक कुटुंब बेरोजगार झाले आहेत.
निसर्गाचा लहरीपणाचा फटका देखील या गावाला चांगला बसला आहे. परिणामी या गावातील लोक अवैध दारु निर्माण करण्याकडे, सट्टापट्टी चालविण्याकडे, जुगार खेळण्याकडे वळले आहेत. अनेक कुटुंब बर्बाद झाले आहेत.
शेती हा मुख्य व्यवसाय असल्यामुळे सुमारे ४० ट्रॅक्टर या गावात आहेत. त्या ट्रॅक्टर मालकांना देखील बारोमास काम मिळत नाही. त्यामुळे सहाजिकच गैरमार्गाने वाळू वाहतूक करीत आहेत. याकडे महसुल प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे. (तालुका प्रतिनिधी)