जिल्हा परिषदेच्या योजनांचा निधी वाढवून द्या
By Admin | Updated: November 8, 2015 00:43 IST2015-11-08T00:43:57+5:302015-11-08T00:43:57+5:30
जिल्हा वार्षिक योजना सन २०१५-१६ अंतर्गत जिल्हा परिषद मार्फत राबविल्या जाणाऱ्या योजनेवर निधी वाढवून देण्यात यावे....

जिल्हा परिषदेच्या योजनांचा निधी वाढवून द्या
पालकमंत्र्यांना निवेदन : विनायक बुरडे यांची मागणी
भंडारा : जिल्हा वार्षिक योजना सन २०१५-१६ अंतर्गत जिल्हा परिषद मार्फत राबविल्या जाणाऱ्या योजनेवर निधी वाढवून देण्यात यावे अशी मागणी जि.प. बांधकाम व आरोग्य समितीचे सभापती विनायक बुरडे यांनी सार्वजनिक आरोग्य तथा पालकमंत्री डॉ.दिपक सावंत यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
मौजा केसलवाडा ता.लाखनी जिल्हा भंडारा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राकरिता २०१५-१६ मध्ये जिल्हाधिकारी कडून शासकीय जागेची ताबा पावती देण्यात आलेली आहे. सदर प्राथमिक आरोग्य केंद्र बांधकामासाठी अंदाजे ५ कोटी रुपयाच्या निधीची आवश्यकता असल्याने सदर निधी मंजूर करण्यात यावा, पोहरा ता.लाखनी जि. भंडारा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत व अधिकारी, कर्मचारी निवासस्थानाचे बांधकाम फार जुने असून इमारत जीर्ण झालेली आहे. त्यामुळे कोणताही धोका व जिवीतहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी प्राथमिक आरोग्य केंद्र पोहरा येथील नवीन इमारत व निवासस्थान बांधकामासाठी अंदाजे ५.०० कोटी रुपये मंजूर करण्याची करावी, प्राथमिक आरोग्य केंद्र शहापूर ता.जि. भंडारा अंतर्गत मौजा सालेबर्डी येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र हे गोसेखुर्द प्रकल्पाचे बुडीत क्षेत्रात येत असल्याने सदर उपकेंद्र मौजा कवडसी ता.जि. भंडारा येथे स्थलांतर करण्यास मंजूरी बाबतचा प्रस्ताव सहसांलक, आरोग्य सेवा, मुंबई यांना सादर करण्यात आला, सदर प्रस्ताव त्यांचेकडून कक्ष अधिकारी, सार्वजनिक आरोग्य विभाग, मंत्रालय मुंबई यांना मंजुरीस्तव सादर करण्यात आलेला आहे. सदर प्रस्तावास मंज़ुरी प्रदान करा, जिल्ह्यामध्ये जिल्हा महिला व बाल आरोग्य दवाखाना संबंधात प्रस्ताव सन २०१२ मध्ये प्रस्तावित केला. सदर दवाखाना बांधकाम करण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी अजूनपर्यंत जागा उपलब्ध करून दिली नाही असे निदर्शनास येते.
सदर जागा उपलब्ध करून देवून शासनाच्या नियोजनातील जिल्हा महिला व बालआरोग्य दवाखान्याला तात्काळ मंजुरी प्रदान करून बांधकाम करण्यात यावे, यासह जि.प. योजनांचा निधी वाढवून द्यावे, अशी मागणी निवेदनात नमूद आहे. (नगर प्रतिनिधी)