जिल्ह्यात कोरोना टेस्टिंग केंद्रात वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:35 IST2021-03-31T04:35:44+5:302021-03-31T04:35:44+5:30
नागरिकांनी टेस्ट करावी लसीकरण करून घ्यावे भंडारा : कोरोनाची रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत असून, वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जास्तीत-जास्त नागरिकांची कोरोना ...

जिल्ह्यात कोरोना टेस्टिंग केंद्रात वाढ
नागरिकांनी टेस्ट करावी
लसीकरण करून घ्यावे
भंडारा : कोरोनाची रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत असून, वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जास्तीत-जास्त नागरिकांची कोरोना टेस्ट करण्यासाठी जिल्ह्यात टेस्टिंग कॅम्पमध्ये वाढ करण्यात आली आहे. नागरिकांनी या केंद्रात जाऊन टेस्ट करावी व कोविड प्रोटोकॉलचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी केले आहे.
जिल्हा प्रशासनाने नागरिकांच्या कोविड टेस्टवर भर दिला असून, टेस्टिंग सेंटरची संख्या वाढविण्यात आली आहे. जिल्ह्यातील १७० आरोग्य केंद्रे, ३४ प्राथमिक आरोग्य केंद्रे, ११० जिल्हा व उपजिल्हा रुग्णालये आणि जिल्ह्यातील २१ खासगी लॅबचा समावेश आहे. त्याचप्रमाणे नागरिकांना सुविधा व्हावी म्हणून विविध ठिकाणी कॅम्पचे आयोजन करण्यात येत आहे.
सर्व महाविद्यालयांतील कार्यरत कर्मचाऱ्यांची टेस्ट करण्यास सुरुवात झाली असून, आज जे. एम. पटेल महाविद्यालयात टेस्ट कॅम्प लावण्यात आला होता. सनफ्लॅग व आयुध निर्मानी या ठिकाणी जिल्हाधिकारी यांच्या पुढाकाराने लवकरच टेस्टिंग कॅम्पचे आयोजन करण्यात येणार आहे. जिल्ह्यात असलेल्या बार रेस्टॉरंटमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचीसुद्धा कोविड टेस्ट करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.
बॉक्स
मृत्यू संख्या वाढत आहे
कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूची संख्या अलीकडे वाढली आहेत. लक्षणं जाणवल्यावरसुद्धा टेस्टिंगसाठी उशीर होत असल्यामुळे धोका वाढत आहे. ज्यांनी लस घेतली नाही, त्यांच्याबाबतीत धोका अधिक प्रमाणात आहे. ताप व खोकला यासारखी लक्षणे आढळताच तात्काळ टेस्ट करून घ्यावी, असेही त्यांनी सांगितले