अपूर्ण रेल्वे पुलाचा ग्रामस्थांना फटका

By Admin | Updated: January 8, 2015 22:50 IST2015-01-08T22:50:52+5:302015-01-08T22:50:52+5:30

दक्षिण - पूर्व रेल्वेच्या तुमसर रोड रेल्वे स्थानकावरील उत्तर दिशेचा प्रवाशी पूल रेल्वे स्थानकाबाहेर नसल्याने शेकडो प्रवाशी व ग्रामस्थांना दररोज फटका बसत आहे. रेल्वेच्या भरारी पथकाच्या

Incomplete railway bridge hits villagers | अपूर्ण रेल्वे पुलाचा ग्रामस्थांना फटका

अपूर्ण रेल्वे पुलाचा ग्रामस्थांना फटका

तुमसर : दक्षिण - पूर्व रेल्वेच्या तुमसर रोड रेल्वे स्थानकावरील उत्तर दिशेचा प्रवाशी पूल रेल्वे स्थानकाबाहेर नसल्याने शेकडो प्रवाशी व ग्रामस्थांना दररोज फटका बसत आहे. रेल्वेच्या भरारी पथकाच्या तिकीट तपासणीप्रसंगी ग्रामस्थांना प्रवासी समजून त्यांच्याकडून हजारोंचा दंड वसूल करण्यात येतो. मागील अनेक वर्षापासून हा पुल अर्धवट आहे.
तुमसर रोड दक्षिण पूर्व रेल्वेचे महत्वपूर्ण जंक्शन असून प्रवाशांकरिता येथे पूल तयार करण्यात आले होते. या पुलाचा एक टोक रेल्वे स्थानकाच्या आत आहे. तो बाहेर काढण्याची येथे गरज आहे. यापूर्वी या संदर्भात विभागीय रेल्वे महाव्यवस्थापक व रेल्वेचे महाव्यवस्थापकांना स्थानिक रेल्वे स्थानक सल्लागार समितीने मागणी केली होती. परंतु रेल्वे प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले.
मालगाड्यांचा प्लॅटफॉर्म क्रमांक एक वर दोन ते तीन दिवस येथे उभ्या राहतात.डाऊन प्रवासी गाड्यांना येथे फलाटक्रमांक दोन वर घेतल्या जातात. यामुळे अपंग, महिला, वृद्ध प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागतो.
१३ जानेवारी रोजी येथे रेल्वेचे महाव्यवस्थापक अनुपकुमार टंडन यांचा निरीक्षण दौरा आहे. या समस्येसंदर्भात रेल्वे समिती सदस्य आलमखान, नगरसेवक प्रमोद तितीरमारे, देवसिंग सव्वालाखे, मोहन भोयर, संजय केवट, अ‍ॅड.राजेश राहुल, सुशिल बंसोड निवेदन देणार आहेत. अपूर्ण रेल्वे पुलाअभावी येथील ग्रामस्थांना विनातिकीट प्रवाशी समजून हजारोंचा दंड वसूल करते. तुमसर रोड गाव दोन भागात रेल्वेमुळे विभागले गेले आहे.
एक महिना अथवा दीड महिन्यात रेल्वेचे भरारी पथक येथे तिकीट तपासणीकरिता येते हे विशेष.
(तालुका प्रतिनिधी)

Web Title: Incomplete railway bridge hits villagers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.