पावसाळी पोलीस क्रीडा स्पर्धाचे उद्घाटन

By Admin | Updated: August 30, 2016 00:23 IST2016-08-30T00:23:03+5:302016-08-30T00:23:03+5:30

जिल्ह्यातील पोलीस क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन सोहळा पोलीस मुख्यालय कवायत मैदानावर पार पडला.

Inauguration of rainy police sports competition | पावसाळी पोलीस क्रीडा स्पर्धाचे उद्घाटन

पावसाळी पोलीस क्रीडा स्पर्धाचे उद्घाटन

भंडारा : जिल्ह्यातील पोलीस क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन सोहळा पोलीस मुख्यालय कवायत मैदानावर पार पडला. या कार्यक्रमाला जि.प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी अहिरे, साकोलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी संख्ये, पोलीस उपअधिक्षक (गृह) के. एच. धात्रक, पो.नि.वनिशा राऊत, पोलीस मुखालय येथील राखीव पोलीस निरीक्षक लोळे सर्व पोलीस ठाण्याचे व शाखेचे प्रभारी अधिकारी व कर्मचारी हे कार्यक्रमाला उपस्थित होते. तसेच परेड संचालन राखीव पोलीस उपनिरीक्षक के. प्रधान यांनी केले. यावेळी पाचही पोलीस उपविभाग पोलीस मुख्यालय भंडारा, तुमसर, साकेली व पवनी येथील पोलीस खेळाडूंची परेडला उपस्थिती होती. कार्यक्रमाचे उद्घाटन साकोली पोलीस उपविभागीय अधिकारी संख्ये यांच्या हस्ते दिप प्रज्वलनाने झाले. यावेळी बोलतानी खेळाला जास्त प्राधान्य दिले पाहिजे. खेळामुळे फिटनेस राहतो. असे त्यांनी सांगितले.
यानंतर राखीव पोलीस उपनिरीक्षक के. प्रधान यांनी राष्ट्राचा सम्मान तसेच खेळाचा सन्मान होईल अशी शपथ खेळाडूंना दिली. संचालन आरती देशपांडे व पोलीस शिपाई यांगिनी नाकतोडे यांनी केले. (प्रतिनिधी)

Web Title: Inauguration of rainy police sports competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.