श्री साई मंदिर बगिच्याचे प्रफुल्ल पटेलांच्या हस्ते उद्घाटन
By Admin | Updated: May 24, 2017 00:23 IST2017-05-24T00:23:05+5:302017-05-24T00:23:05+5:30
श्री साई मंदिर बगिच्याचे उद्घाटन खासदार प्रफुल्ल पटेल यांचे हस्ते करण्यात आले.

श्री साई मंदिर बगिच्याचे प्रफुल्ल पटेलांच्या हस्ते उद्घाटन
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : श्री साई मंदिर बगिच्याचे उद्घाटन खासदार प्रफुल्ल पटेल यांचे हस्ते करण्यात आले. भंडारा शहरातील वैनगंगा नदीच्या तीरावर अत्यंत सुंदर, मनमोहक बगीच्याचे उद्घाटन करताना मला फार आनंद होत आहे. भंडारावासीयांना कुंबियांसह येण्याकरिता हे एकमेव स्थान आहे. सोबतच श्री साई बाबांचाही आशीर्वाद घेता येईल असे प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले.
श्री साई मंदिराचे अध्यक्ष धनंजय दलाल यांनी प्रास्ताविक करून शाल, श्रीफळ देऊन खा.पटेल याचे स्वागत केले.
याप्रसंगी केशवराव निर्वाण, मधुकर कोल्हे, दिलीप मोहनकर, निकेत क्षीरसागर, शशी अवघाते, बाळू कोल्हे, भरत भलगट, अनिल जैन, सर्व विश्वस्त मंडळाचे सदस्य यांनीही पटेल यांचे स्वागत केले.
याप्रसंगी ईश्वरलाल काबरा, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.रविशेखर धकाते, द्वारका सारडा, लॉ.वांदिले, पंकज सारडा, मोहन नायर, खेमू चड्डा, धारा आनंद, प्रभात गुप्ता, डॉ.जगदीश निंबार्ते, बाबा टॅक्सीवाले, भरत मल्होत्रा, किरीट पटेल, टिल्लू तलदार, सुनिल फुंडे, मधुकर कुकडे, रामलाल चौधरी, आशिष दलाल, सागर गणवीर, बशिर पटेल, शम्मू शेख, शहजादा अनिक जमा, राजू हाजी सलाम, नितीन तुमाने, महेंद्र बारापात्रे, निमकर, कृष्णा उपरीकर, फजल पटेल, अक्षय रामटेके, जॉन स्कॉट, इंद्रजीत आनंद, टकरे, साई समितीचे बरेच सदस्य उपस्थित होते.