चालकांचे मानसिक आरोग्य सुदृढ व्हावे
By Admin | Updated: September 18, 2015 00:42 IST2015-09-18T00:32:47+5:302015-09-18T00:42:22+5:30
चालकाने त्यांच्या अखत्यारीत असलेले चारचाकी वाहन काळजीपूर्वक सांभाळले पाहिजे.

चालकांचे मानसिक आरोग्य सुदृढ व्हावे
हेमकृष्ण कापगते यांचे प्रतिपादन : ‘ड्रायव्हर डे’निमित्त आरोग्य, नेत्र तपासणी शिबिर
लाखनी : चालकाने त्यांच्या अखत्यारीत असलेले चारचाकी वाहन काळजीपूर्वक सांभाळले पाहिजे. तसेच स्वत:च्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. शारीरिक आरोग्यासोबतच मानसिक आरोग्य चांगले असले पाहिजे. मनावर संयम हवा अपघाताच घटना टाळल्या पाहिजेत, असे विचार ‘ड्रायव्हर डे’ निमित्त माजी आमदार डॉ.हेमकृष्ण कापगते यांनी व्यक्त केले.
स्थानिक इंडियन आॅयल कंपनीचे श्री गणेश सर्वो सेंटर पेट्रोल पंपद्वारे ड्रायव्हरसाठी आरोग्य शिबिर व नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इंडियन आॅयलचे विक्री व्यवस्थापक सी.के. नंदनकर उपस्थित होते. अतिथी म्हणून डॉ.हेमकृष्ण कापगते, डॉ.अरविंद राव, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल आदे, सहाय्यक अधिकारी सुनिल इंगोले, एच.ए. बोरकर, म.वा. बोळणे आदी उपस्थित होते. ‘ड्रायव्हर डे’ निमित्त आरोग्य शिबिराचे आयोजन करून सामाजिक उत्तरदायीत्व जोपासण्याचे काम करीत असल्याचे नंदनकर यांनी स्पष्ट केले. अतुल आदे यांनी अपघाताच्या घटना मानवाच्या दुर्लक्ष केल्यामुळे होत असतात. चालकाने काळजीपूर्वक वाहन चालविले तर दुर्घटना कमी करता येवू शकतात, असे विचार व्यक्त केले. आरोग्य शिबिरात २०० आॅटो व ट्रक चालकांची तपासणी करण्यात आली. तसेच महात्म्ये नेत्र पेढी व रुग्णालयाद्वारे डॉ.अरविंद यांनी २०० ड्रायव्हारच्या डोळ्यांची तपासणी करून औषधे वितरीत केली. डॉ.हेमकृष्ण कापगते यांनी ड्रायव्हरची तपासणी करून आरोग्यवर्धक औषधांचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन डॉ.गजानन डोंगरवार यांनी तर आभार प्रदर्शन सदानंद डोंगरवार यांनी केले. (तालुका प्रतिनिधी)