आजही जपले जाते पाटा-वरवंट्याचे महत्त्व
By Admin | Updated: January 21, 2016 00:53 IST2016-01-21T00:53:11+5:302016-01-21T00:53:11+5:30
'तिखट-मिरची पाट्यावरची' अशी म्हण आजही तेवढीच महत्वाची आहे,जेवढी आधी होती. सध्याच्या युगात मिक्सर ग्रार्इंडरचा उपयोग घरोघरी होत चालला तरी खवैये लोकांना पाट्यावर तयार केलेले तिखट जास्त आवडते.

आजही जपले जाते पाटा-वरवंट्याचे महत्त्व
तिखट मिरची पाट्यावरची : मिक्सर ग्रार्इंडरच्या युगात ग्रामीणांमध्ये आजही केला जातो उपयोग
भंडारा : 'तिखट-मिरची पाट्यावरची' अशी म्हण आजही तेवढीच महत्वाची आहे,जेवढी आधी होती. सध्याच्या युगात मिक्सर ग्रार्इंडरचा उपयोग घरोघरी होत चालला तरी खवैये लोकांना पाट्यावर तयार केलेले तिखट जास्त आवडते.
आदी काळापासूनच अन्न, वस्त्र, निवारा या तीन मानवाच्या मूलभूत गरजा मानल्या जातात. त्यात अन्न ही प्रथम सर्व महत्वाची गरज. शरीराला टिकवून ठेवायचे असेल तर मनुष्य अन्नाशिवाय राहू शकत नाही. अन्नाविना जगू शकत नाही. अन्न ही मनुष्याची नित्याची गरज. मग अन्न कसे असावे, काय असावे, त्यात काय समाविष्ट असावे, यालाही तेवढेच महत्व असते.
भात किंवा भाकर व पोळीचा उपयोग पोट भरण्यासाठी केला जातो. परंतु त्याचबरोबर शरीराला पोषकता व तोंडाला स्वाद आदीचा विचार करीत त्यासोबत भाजी तेवढीच महत्वाची असते. मग भाजीमध्ये स्वाद किंवा गरज म्हणून मीठमिरची, हळद, कांदा, लसून, तेल वगैरे पदार्थांचे फार महत्व असते.
यात काही पदार्थ सरळ भाजीत टाकता येत नाही. त्यामुळे त्यांना पिसने, मिक्स करणे आवश्यक असते. या गरजेमुळे पाटा-वरवंटा जन्माला आला.मनुष्याने दगडाचा उपयोग पाटा-वरंवटासाठी करणे सुरू केले. त्याचा उपयोग आजही महत्वपूर्ण ठरत आहे.
कालांतराने तिखट बनविण्याचे अनेक उपकरण, साधन तयार केले गेले. मशीनचा उपयोग होऊ लागला. एवढेच नाही तर आयते तिखट बाजारात उपलब्ध होऊ लागले.परंतु तरीसुध्दा पाटा-वरवंटा याचे महत्व मुळीच कमी झाले नाही. सामान्यत: भाजीमध्ये लाल तिखट जास्त वापरला जातो.
त्याचे पावडर बाजारात सर्वत्र उपलब्ध असते. परंतु ग्रामीण भागात राहणारे लोक रोज लाल मिरच्या आवश्यक प्रमाणात घेऊन त्यासोबत लसून, आले, धनिया, तेजपान, काळी मिर्च, शेंगदाने, जिरे इत्यादी मसाल्याच्या वस्तू पाट्यावर पिसून त्याचे ओले तिखट मसाले तयार करून भाजीत टाकणे पसंद करतात.
विशेषकरून मासांहार करणारे लोक; मटन, चिकन, अंडी, मासोळी बनवताना पात्यावर तयार केलेले ओले रसयुक्त तिखट मसाल्यांना जास्त पसंती देतात. अशा तिखटामुळे भाजीला विशेष चव येते, असे त्यांचे म्हणणे असते.
वाढत्या शहरीकरणामुळे व विलासी जीवनशैलीमुळे अनेक महिला पाट्यावर तिखट तयार करण्याला टाळतात. त्यामुळे ते लोक जास्त करून मिक्सर ग्रार्इंडर मशीनचा अधिक उपयोग करतात. परंतु शहरातसुध्दा अनेक लोक पाटा-वरवंटा आपल्या घरी ठेवून त्याचा वेळोवेळी उपयोग करतात. (नगर प्रतिनिधी)