आनंदी जीवनात संवादाचे महत्त्व अनन्यसाधारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2019 21:57 IST2019-01-19T21:57:36+5:302019-01-19T21:57:56+5:30

संक्रांतीचा सण हा पावन पर्व असला तरी वर्षभर आपण आनंदी आहोत किंवा नाही हा विचार करणे अत्यंत महत्वाचे आहे. महर्षी महेश योगीजी यांनी आपल्या संपूर्ण जीवनात मानव समूहाला आनंदमय जीवन जगण्याचाच संदेश दिला. त्यामुळे आनंदी जीवनात संवादाचे अनन्यसाधारण महत्व आहे, असे प्रेरणादायी विचार महर्षी विद्या मंदिर शाळेच्या प्राचार्य श्रुती ओहळे यांनी केले.

The importance of communication in happy life is unique | आनंदी जीवनात संवादाचे महत्त्व अनन्यसाधारण

आनंदी जीवनात संवादाचे महत्त्व अनन्यसाधारण

ठळक मुद्देप्राचार्य श्रुती ओहळे यांचे विचार

भंडारा : संक्रांतीचा सण हा पावन पर्व असला तरी वर्षभर आपण आनंदी आहोत किंवा नाही हा विचार करणे अत्यंत महत्वाचे आहे. महर्षी महेश योगीजी यांनी आपल्या संपूर्ण जीवनात मानव समूहाला आनंदमय जीवन जगण्याचाच संदेश दिला. त्यामुळे आनंदी जीवनात संवादाचे अनन्यसाधारण महत्व आहे, असे प्रेरणादायी विचार महर्षी विद्या मंदिर शाळेच्या प्राचार्य श्रुती ओहळे यांनी केले.
मकरसंक्रांतीच्या पावन पर्वावर लोकमततर्फे गुड बोला गोड बोला अभियान राबविले जात आहे. त्या अंतर्गत बोलताना प्राचार्य ओहळे म्हणाल्या की, मानवी जीवनात संवादाला अत्यंत महत्वाचे स्थान आहे. मनुष्याच्या बोलीत कडूपणा असेल तर ते कधीही कुणी खपवून घेत नाही. मनुष्य जीवन एकदाच मिळत असल्याने आपल्या बोलण्यातून किंवा संवादातून कुणाचेही मन न दुखवता जीवन जगणे हीच खरी कला आहे. यातूनच आनंदमय जीवन जगण्याची प्रेरणा मिळू शकते. नैराश्य किंवा हीन भावना आपल्यामध्ये कधीही न आणता सदैव सकारात्मक विचार करणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी महर्षींनी सांगितलेल्या ध्यान, योग, साधना या महत्वपूर्ण माध्यमांचा वापर प्रत्येकाने आपल्या जीवनात केला पाहिजे. बोलण्यातून कुणाला धीर मिळत असेल तर ती अत्यंत चांगली बाब आहे. परिणामी त्या व्यक्तीची समस्या ही क्षणात सुटू शकते. गोड बोलण्यातून माणसे जोडण्याची कला फक्त मनुष्याला अवगत असल्याने त्याचा सकारात्मक वापर व्हायला हवा.

मकरसंक्रांतीच्या पर्वावर सूर्य तेजोमयाकडे जात असताना आपले विचारही तेवढेच गतीमान व उद्देशपूर्ण असले पाहिजे. मेहनत, चिकाटी, उत्साह व सत्यता हे गुण अंगीकारून प्रत्येकाने विकासाकडे वाटचाल करावी असेही प्राचार्य ओहळे म्हणाल्या.

Web Title: The importance of communication in happy life is unique

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.