स्थलांतरितांनी मायग्रंट अर्बन सपोर्ट सेंटरचा लाभ घ्यावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2021 04:21 IST2021-03-29T04:21:46+5:302021-03-29T04:21:46+5:30
भंडारा शहरातील माविम अंतर्गत नवप्रभा लोकसंचालित साधन केंद्र येथे यूएनडीपी अंतर्गत तरुणांच्या रोजगाराचा प्रश्न सोडविण्यासाठी चित्ररथाच्या उद्घाटन समारंभाप्रसंगी त्या ...

स्थलांतरितांनी मायग्रंट अर्बन सपोर्ट सेंटरचा लाभ घ्यावा
भंडारा शहरातील माविम अंतर्गत नवप्रभा लोकसंचालित साधन केंद्र येथे यूएनडीपी अंतर्गत तरुणांच्या रोजगाराचा प्रश्न सोडविण्यासाठी चित्ररथाच्या उद्घाटन समारंभाप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी केंद्राच्या अध्यक्षा विना लाडे, क्षेत्रीय समन्वयक मनोज केवट, लेखपाल रोशन साकोरे, सहयोगिनी अरुणा बांते, शोभा आंबुने, सीआरपी व अन्य महिला उपस्थित होत्या.
यावेळी व्यवस्थापक रंजना खोब्रागडे यांनी भंडारा शहरात माविम अंतर्गत विविध बचत गट तसेच शहराच्या विविध भागातील ३,२०० तरुण तसेच महिलांचा सर्व्हे केला असल्याची माहिती दिली. अन्य महिलांनीही माविमच्या या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले. साधन केंद्राच्या अध्यक्षा विना लांडे यांनी महिलांची जिद्द व कोरोना संकटात स्वतःचा जीव धोक्यात घालून निवडलेल्या कर्तव्य सर्व टीमचा गौरव केला. क्षेत्रीय समन्वयक मनोज केवट यांनी सुशिक्षित बेरोजगारीवर मात करण्यासाठी तरुणांना या निमित्ताने एक चांगली सुवर्ण संधी मिळत असून विविध व्यवसायाचे कौशल्य आत्मसात केल्याने बेरोजगारीवर मात करण्यासाठी महिलांनी लाभ घेण्याचे आवाहन केले. चित्ररथाच्या उद्घाटन समारंभासाठी नवप्रभात लोकसंचालित साधन केंद्राचे पदाधिकारी तसेच अन्य कर्मचारी उपस्थित होते. यावेळी फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करण्यात आले.