सावित्रीबार्इंचे विचार आत्मसात करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2018 22:11 IST2018-01-19T22:10:48+5:302018-01-19T22:11:59+5:30
मोठ्या पदावरील भगिनी वैज्ञानिक दृष्टीकोन जागृत न करता अंधश्रद्धेला बळी पडत असल्याचे दृश्य भारतीय समाजात दिसत आहे.

सावित्रीबार्इंचे विचार आत्मसात करा
आॅनलाईन लोकमत
तुमसर : मोठ्या पदावरील भगिनी वैज्ञानिक दृष्टीकोन जागृत न करता अंधश्रद्धेला बळी पडत असल्याचे दृश्य भारतीय समाजात दिसत आहे. हे आपल्या समाजाचे दु:ख आहे. तेव्हा अज्ञान न स्वीकारता विज्ञान स्वीकारावे. भारतीय स्त्रियांचा श्वास सावित्रीबाई ज्योतिबा फुले आहेत. मृतवत झालेल्या भारतीय स्त्रियाला नवसंजीवनी दिली. भारतीय स्त्रियांना सन्मान दिला. सावित्रीबाई फुले यांचे विचार प्रत्येकानी आत्मसात करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन भंडारा जिल्हाध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरमचे राहुल डोंगरे यांनी प्रतिपादन केले.
महात्मा ज्योतीराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मारक समिती बोरीच्या वतीने आयोजित समाजप्रबोधन कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. सचिव बेरूरकर होते. प्रमुख अतिथी म्हणून पं.स.सभापती कविता बनकर, माजी सभापती कुसुम कांबळे, सरपंच अविनाश उपरीकर, उपसरपंच अरविंद भेदे, माजी सरपंच नामदेव कांबळे, माजी सरपंच भाऊराव उपरीकर, सुगंधा राहूल डोंगरे, माजी सरपंच सुरेंद्र राऊत, ग्रा.पं. सदस्या अनिता कांबळे, लता कांबळे, रेशमा बोरकर, निशा धावडे, तंटामुक्ती अध्यक्ष रोशनलाल कांबळे, ललिता उपरीकर, सेवक उपरीकर, हसेंद्र कांबळे आदी उपस्थित होते.
राहूल डोंगरे म्हणाले, भारतात फुले दाम्पत्य जन्मास आले नसते तर शिक्षणाची गंगा समाजातील खालच्या वर्गापर्यंत पोहचली नसती आणि भारतीय समाजातील स्त्रीयांचे विश्व चूल आणि मूल एवढेच सीमित असते. पण आमच्या समाजातील स्त्रियांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुल्यांच्या सामाजिक व शैक्षणिक चळवळीतील योगदानाची माहिती नाही. मोठ्या पदावर गेलेल्या व पगार घेणाºया भगिनी सुद्धा वैज्ञानिक दृष्टीकोन जागृत न करता अंधश्रद्धेला बळी पडत असल्याचे दृश्य भारतीय समाजात दिसत आहे. देशाला आज सावित्रीबाई फुले यांच्या विचाराची गरज निर्माण झाली आहे.
प्रास्ताविक सरपंच अविनाश उपरीकर यांनी केले. गावाचा सर्वांगिण विकास हेच माझे ध्येय आहे, असे आवर्जून सांगितले. प्रा. सचिन वेरूळकर यांनी स्पर्धेच्या जगात टिकाव धरण्यासाठी आत्मविश्वास व चिकाटी हे गुण आत्मसात करा, असा संदेश देवून ध्येयाकडे वाटचाल करण्याचा सल्ला दिला. १० वी व १२ वीत प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांना स्मृतीचिन्ह देवून सत्कार करण्यात आला.
हभप हिराजी पंचबुधे महाराज व हभप विक्की चन्ने महाराज धापेवाडा यांनी किर्तनातून समाजप्रबोधन केले. संचालन व आभार प्रदर्शन उत्तम नगरधने यांनी केले. कार्यक्रमासाठी महात्मा ज्योतिबा फुले स्मारक समिती, देवस्थान पंचकमेटी, ग्रा.पं. कमेटी जि.प. पूर्व माध्य शाळा, महात्मा ज्योतिबा फुले क्रिडामंडळ, पुरूष बचत गट, महिला बचत गट बोरी वासियांनी अथक परिश्रम घेतले.