रॉकेलची अवैध वाहतूक तरुणाला रंगेहात पकडले
By Admin | Updated: April 6, 2015 00:43 IST2015-04-06T00:43:43+5:302015-04-06T00:43:43+5:30
: पवनी पोलीस ठाण्यांंतर्गत येनोळा येथे मागासवर्गीय महिला बचत गटकडे रॉकेल विक्रीचा प्रशासकीय परवाना आहे.

रॉकेलची अवैध वाहतूक तरुणाला रंगेहात पकडले
पवनी पोलिसांची कारवाई : ३५ लिटर तेल जप्त
पालोरा : पवनी पोलीस ठाण्यांंतर्गत येनोळा येथे मागासवर्गीय महिला बचत गटकडे रॉकेल विक्रीचा प्रशासकीय परवाना आहे. या बचत गटातील एका सदस्याने गावात तेलाचे अल्प प्रमाणात वाटप करुन ३५ लिटर तेल ४० रुपये प्रमाणे फारुग मोहमद शेख (३५) भाईतलाव वॉर्ड पवनी याला आज सकाळी १० वाजता विकत दिले. ही बाब ग्रामस्थांच्या लक्षात येताच त्याला अडविले. याची माहतिी पोलिस ठाणे व पुरवठा विभागाला देण्यात आली. शेखकडून तेलाची कॅन व दुचाकी एम एच ३५-५०५७ जप्त करुन अटक केली आहे.
येथे अनेक वर्षापासून येथे महिला बचत गटाकडे रॉकेल विक्रीचा परवाना आहे. प्रशासनाकडून योग्य नियमाप्रमाणे रॉकेलचा साठा पाठविला जात होता.
मात्र जनतेला दिशाभूल करुन तेलाचे अल्प प्रमाणात वाटप करुन उर्वरित रॉकेल विक्री करणे बऱ्याच दिवसापासून सुरु होते.
अखेर रविवारी सकाळी १० येथील शेतकरी संघटनेचे अध्यक्ष किशोर पंचभाई यांनी पुढाकार घेवून ग्रामस्थांच्या सहकार्याने रॉकेलची वाहतूक करणाऱ्या या इसमाला रंगेहात पकडण्यात आले.
तालुका पुरवठा अधिकारी मुंडे यांनी कागदपत्रांची कागदोपत्री पाहणी करुन पंचनामा केला. गा्रमस्थांचा रोष शांत करुन या संदर्भात तात्काळ कारवाई करण्याचे आश्वासन दिले. याकरिता डेबू पंचभाई, सतीश तलमले, रुपेश पिसे, दिलीप मदनकर यांनी सहकार्य केले. पुढील तपास पोलिस निरीक्षक सुरेश टेकाम करीत आहे. (वार्ताहर)