शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

चप्राड येथे गौण खनिजांची अवैध चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2019 01:02 IST

वैनगंगा नदी खोऱ्यात असणाºया चप्राड परिसरातील नदी काठावरील गावात अनाधिकृत डम्पिंग यार्ड तयार करण्यात आले आहे. नद्यांच्या पात्रातून दिवसाढवळ्या रेतीचा उपसा करण्यात येत असून, रात्रीच या रेतीची विल्हेवाट लावण्यात येत आहे.

ठळक मुद्देकोट्यवधींचा महसूल बुडाला : महसूल विभागाच्या आशीर्वादाने माफियांचे धाडस वाढले

लोकमत न्यूज नेटवर्कलाखांदूर : वैनगंगा नदी खोऱ्यात असणाºया चप्राड परिसरातील नदी काठावरील गावात अनाधिकृत डम्पिंग यार्ड तयार करण्यात आले आहे. नद्यांच्या पात्रातून दिवसाढवळ्या रेतीचा उपसा करण्यात येत असून, रात्रीच या रेतीची विल्हेवाट लावण्यात येत आहे.जिल्ह्यात रेती घाटांचे लिलाव लांबणीवर का गेले आहेत असा एकच प्रश्न नागरिकांत उपस्थित केला जात आहे. घाटांचे लिलाव झाले नसले तरी रेतीच्या मागणीत वाढ झाली आहे. चोरीच्या प्रकारातून रेतीचा उपसा करण्यात येत असल्याने गावातील रेतीची मागणी विदर्भातील अनेक जिल्ह्यात होत आहे. याच संधीचा फायदा घेण्यासाठी चप्राड परिसरातील नदी काठावरील गावात रेती माफीयांचा उदय झाला आहे.यात रेतीमाफियांनी महसूल आणि अन्य विभागाचे कर्मचारी यांचेसोबत साटेलोटे केली आहे.प्राप्त माहितीच्या आधारे, चप्राड गावाच्या बाहेर तीन ते चार ठिकाणी रेतीची डम्पिंग झालेली पाहायला मिळालेली आहे. यात दिवसाढवळ्या डम्पींग यार्डात रेतीचा उपसा केल्यानंतर या रेतीची विल्हेवाट रात्रभर केली जात आहे, अशी माहीती नागरिकांनी दिली.ट्रक व ट्रॅक्टरच्या नियमित आवाजामुळे आमची झोप उडाली आहे. चुलबंद नदी ते चप्राडच्या कडेला गावाशेजारी, तलावात, शेतात तसेच टोली येथे मस्जिदच्या बाजूला, गावात काही ठिकाणी व आणखी दोन ते तीन ठिकाणी रेती डम्पिंग झालेली दिसली. यामुळे शेतशिवारातून जाणारे पांदन रस्ते रेतीच्या ट्रकांनी उखडली आहेत.या विषयी अधिक माहिती घेतली असता गावातीलच लोकांनी या अवैध धंद्यांत गुंतलेल्या लोकांची यादी दिली. त्यानुसार चप्राड मधील चार ते पाच लोक, लाखांदूरातील दोन आणि चप्राड- मेंढा येथील दोन अशा प्रकारे लोक गुंतलेले दिसल्याचे नागरिकांनी माहिती दिली. ते अधिक माहिती देतांना म्हणाले, की पहाटे चार वाजतापासून ते सकाळी नऊ वाजतापर्यंत दहा ते पंधरा ट्रॅक्टरच्या माध्यमातून रेतीचा अवैध धंदा केला जातो. सदर काम हे राजरोसपणे चालू आहे परंतु महसूल अधिकारी मात्र मूग गिळून गप्प आहेत आणि ही वस्तूस्थिती चप्राड मधीलच नाही तर संपूर्ण तालुक्याची आहे.परिसरात डोक्याला ताप आणणारी रेतीचे चोरी असतांना वाहन जप्तीची कारवाई मोजकीच करण्यात आली. या व्यवसायात अधिक नफा असून जीएसटी देण्याचे भय नसल्याने मुळ व्यवसायाला तिलांजली देत रेतीच्या चोरीत चप्राड शिवारातीलच काही नागरीक गुंतले आहेत.या प्रकरणात तहसील कार्यालयाकडून भेदभाव केला जात असल्याचे दिसून येते. संपूर्ण तालुक्यात जर विचार केला तर रोज १०० ते २०० ट्रिप रेती चोरीला जाते परंतु अधिकाऱ्यांचा अनभिज्ञतेनुसार केवळ महिन्यातून दोन ते चार गाड्या तहसील कार्यालयामध्ये जमा होतात बाकीच्या रेती चोरीच्या गाड्या पकडल्या का जात नाहीत, याविषयी चर्चा नागरिकांमध्ये आहे. लाखांदूर तालुक्यात खनिजांचे अवैध उत्खनन अनेक महिन्यापासून सुरु आहे. मात्र त्यांच्यावर कारवाई करण्यास महसूल प्रशासन धजावत नाही. खनीज उत्खननावर बाळा बसावा, यासाठी जिल्हाधिकाºयांनी लक्ष घालणे गरजेचे झाले आहे. तहसीलदार यांनी कायद्याच्या समानतेनुसार कार्य करावे अशी मागणी होत आहे.महसूल विभाग अनभिज्ञचप्राड परिसरात मोठ्या प्रमाणात रेतीची चोरी करण्यात येत आहे. हा प्रकार सर्वांना माहिती आहे. तलाठ्यांसह मंडळ अधिकारी या परिसरातून नेहमीच आवागमन करतात. परंतु त्यांना ही रेतीची चोरी दिसत नसावे, याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. महसूल विभागाच्या वरिष्ठांनी यावर कारवाई करावी, अशी मागणी नागरिक करीत आहेत.प्रशासनाच्या वतीने अवैध उत्खनन करणाºयांवर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात येते. यात कुठल्याही व्यक्तीवर भेदभाव केला जात नाही.निदर्शनास येणाºया प्रत्येकावर कारवाई करण्यात आली आहे. तलाठी व मंडळ अधिकारी यांना कारवाईसंबंधी निर्देश देण्यात आले आहेत.-संतोष महाले, तहसीलदार, लाखांदूर.

टॅग्स :sandवाळू