रात्रीला होते रेतीचे अवैध खनन
By Admin | Updated: March 3, 2017 00:31 IST2017-03-03T00:31:10+5:302017-03-03T00:31:10+5:30
तालुक्यात रात्रीच्या सुमारास रेतीचे अवैधरीत्या खनन सुरू आहे. याकडे पोलीस व महसूल प्रशासनाचे दुर्लक्ष आहे.

रात्रीला होते रेतीचे अवैध खनन
साकोली : तालुक्यात रात्रीच्या सुमारास रेतीचे अवैधरीत्या खनन सुरू आहे. याकडे पोलीस व महसूल प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. त्यामुळे शासनाचा लाखो रूपयाचा राजस्व बुडत आहे. यासर्व प्रकाराची माहिती संबंधित विभागाला माहित असूनही याकडे हेतुपुरस्पर दुर्लक्ष करीत आहेत.
साकोली तालुक्यात परसोडी, पोवारटोली व वटेटेकर हे तीन रेतीघाट लीलाव झाले आहेत. या रेतीघाटावरून दिवसा फक्त काहीच ट्रॅक्टरद्वारे रेतीची उचल केली जाते. त्यांना प्रतीट्रीपची रॉयल्टी घ्यावी लागते. मात्र ही रॉयल्टी महाग होत असल्यामुळे काही ट्रॅक्टर रात्री धर्मापुरी, महालगाव, गोंडउमरी, मोहघाटा व सेंदुरवाफा येथील नाल्यातून रात्रीच्या सुमारास रेतीचे खनन केले जात असल्याची विश्वसनीय माहिती आहे. तपासणीे पथक फक्त दिवसाच फिरतानी दिसतात. मात्र हे पथक रात्री फिरताना दिसत नाही. (तालुका प्रतिनिधी)
चौकशी करा
रेतीघाटातून दररोज हजारो ट्रीप रेतीचे उत्खनन होत आहे. शासनातर्फे या रेतीघाटांची एक सीमा निश्चित करून दिली आहे. मात्र बऱ्याच रेती घाटावर चांगली रेती नसल्यामुळे सीमांकनाच्या बाहेरून रेतीचे उत्खनन होत आहे. याचीही चौकशी झाली पाहिजे.
चौकी कधी होणार?
शासनाच्या नियमाप्रमाणे अवैध उत्खनन रोखण्यासाठी प्रत्येक रेतीघाटाच्या मार्गावर पोलीस व महसूल विभाग यांची संयुक्त चौकशी असावी असा नियम असतानी साकोली तालुक्यात मात्र एकाही ठिकाणी चौकी तयार करण्यात आल्या नाहीत हे एक आश्चर्यच आहे.