मुरुमाचे अवैध उत्खनन

By Admin | Updated: June 7, 2014 23:45 IST2014-06-07T23:45:59+5:302014-06-07T23:45:59+5:30

खापा-विहीरगाव मार्गावर विईरगाव शिवारात मुरूमाचे नियमबाह्य सर्रास अवैध उत्खनन दिवसाढवळ्या मागील काही दिवसांपासून सुरू आहे. शासनाच्या लाखोंचा महसूल येथे बुडत असताना महसूल प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.

Illegal mining of Muruma | मुरुमाचे अवैध उत्खनन

मुरुमाचे अवैध उत्खनन

तुमसर : खापा-विहीरगाव मार्गावर विईरगाव शिवारात मुरूमाचे नियमबाह्य सर्रास अवैध उत्खनन दिवसाढवळ्या मागील काही दिवसांपासून सुरू आहे. शासनाच्या लाखोंचा महसूल येथे बुडत असताना महसूल प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
तुसमर-भंडारा राज्य मार्गाजवळून खापाकडून विहीरगावकडे रस्ता जातो. विहीरगाव शिवारात रस्त्याशेजारील नियमबाह्य सर्रास मुरूमाचे अवैध उत्खनन मागील अनेक दिवसांपासून सुरू आहे. येथे उत्खननामुळे मोठे खड्डे पडले आहेत. शासनाची येथे लिज नाही.
उत्खनन सुरू आहे
मुरूम असलेल्या जागेकडे मुरूम उत्खनन करणार्‍या माफियांची नजर असते. अनेक ठिकाणी असे अवैध उत्खनन या माफियांनी केले असून आजही सर्रास उत्खनन करणे सुरू आहे. मुरूम उत्खनन करण्याची परवानगी नियमानुसार तहसील कार्यालयाकडून घ्यावी लागते. तत्पूर्वी तलाठी, मंडळ अधिकार्‍यांकडून ना-हरकत प्रमाणपत्र घेणे गरजेचे असते. महसूल प्रशासन शेवटच्या टोकापर्यंत नियुक्त केला आहे, परंतु हे प्रशासन केवळ येथे नावापुरतेच दिसून येते.
अनेक ठिकाणी तलाव परिसरात, शासकीय पडीक जमिनी, गावाबाहेरील खडकाळ जमिनीतून अवैध मुरूम उत्खननाला येथे ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यापासून सुरूवात होते ते जूनच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत सुरूच असते. येथे सर्रास सहा महिने मुरूमाचे अवैध उत्खनन सुरू असते. यामुळे शासनाचा लाखोचा महसूल बुडतो, परंतु महसूल विभागाचे कर्मचारी व अधिकार्‍यांनी आतापर्यंत कुणावरही ठत्तेस कारवाई केल्याचे दिसून येत नाही. तुमसर येथे नव्याने रूजू झालेले तहसीलदारांनी आल्या आल्या अवैध रेती वाहतुकीवर व चोरीवर नियंत्रण प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. नवीन अधिकार्‍यांचा तो शिरस्ताच मानला जातो. तालुक्यात धाक निर्माण करणे हा त्यातील एक भाग आहे, परंतु त्यानंतर मात्र सर्व गप्प दिसत आहेत.
काय आहे नियम?
अवैध मुरूम उत्खनन करणे, चोरी करणे, रती उत्खनन व चोरी करणे, तिची वाहतूक करणे याप्रकरणी फौजदारी गुन्ह्याची तरतूद कायद्यात आहे, परंतु असा फौजदारी गुन्हा कुणीच नोंदवीत नाही. ओव्हरलोड रेती वाहतूक करणार्‍यावर केवळ क्षमतेपेक्षा जास्त रेती वाहून नेल्याप्रकरणी दंड आकारला जातो. परंतु क्षमतेपेक्षा रेती वाहून नेणार्‍यावर चोरीचा गुन्हा दाखल करण्याची गरज आहे तसा कायदा आहे, परंतु तसे होतानी दिसत नाही. पुन्हा राजरोसपणे तशीच वाहतूक सुरू राहते. जिल्हाधिकार्‍यांनी रेती वाहून नेणार्‍या ट्रकवर कारवाईचे आदेश दिले आहेत, परंतु तुमसर-भंडारा-तुमसर-रामटेक मार्गावरून दररोज सकाळी ५.३0 ते ७ दरम्यान सुमारे ६0 ते ७0 ट्रक रेती वाहून नेत आहेत. तिरोडा येथील रेतीघाटावरील हे ट्रक असल्याची माहिती आहे. (तालुका प्रतिनिधी)
 

Web Title: Illegal mining of Muruma

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.