कोंढा परिसरात अवैध सावकारी तेजीत
By Admin | Updated: October 29, 2014 22:46 IST2014-10-29T22:46:01+5:302014-10-29T22:46:01+5:30
राज्य शासनाने अवैध सावकारीला आळत्त घालण्यासाठी कडक कायदे केले तरी देखिल शेतकऱ्यांना व लहान व्यापाऱ्यांना खासगी, सावकार आपल्या जाळ्यात अडकवून परिसरात

कोंढा परिसरात अवैध सावकारी तेजीत
कोंढा (कोसरा) : राज्य शासनाने अवैध सावकारीला आळत्त घालण्यासाठी कडक कायदे केले तरी देखिल शेतकऱ्यांना व लहान व्यापाऱ्यांना खासगी, सावकार आपल्या जाळ्यात अडकवून परिसरात त्यांच्याकडून शेकडा ३ ते ५ रूपये महिना व्याज वसूल करीत असल्याने शेतकऱ्यांना लुटत असल्याचे चित्र परिसरात दिसते आहे. या खासगी सावाकाराकडे कोणतेही शासकीय परवाने नाहीत. हे मात्र विशेष.
कोंढा येथे दर बुधवारला प्रसिद्ध म्हैस बाजार भरते. येथे अनेक लहान, मोठे व्यापारी आहेत ते खासगी सावकाराकडून ८ दिवस १५ दिवस, ३० दिवस यासाठी हजारो रूपये घेतात. त्यासाठी ५ रूपये पासून १० रूपये प्रतिशंभरावर व्याज घेतले जात आहे. शेतकरी बांधव शेतीकरण्यासाठी मोठ्या प्रमाणात खासगी सावकाराकडून कर्ज काढत असल्याची विश्वसनीय माहिती आहे. १ लाख रूपये कर्ज घेतल्यास १ एकर जागेची रजिस्ट्री सावकार करून मागत असतात. अशाप्रकारे ठराविक कालावधीत व्याजासहित पैसे परत न केल्यास जमिन खासगी सावकाराच्या मालकीची होत असते, असे प्रकार होत आहे. पैसे परत न केल्याने अनेक गरीब शेतकऱ्यांच्या जमिनी सावकारांनी हडप केल्या आहेत. पण याबद्दल शेतकरी देखिल आवाज उठवत नाही. त्यामुळे शोषणाचे प्रकार वाढले आहे. कोंढा परिसरात मागील तीन, चार वर्षापासून नैसर्गीक संकटे येत आहेत. अशावेळी शेतकरी कर्ज बाजारी होण्याचे प्रमाण वाढले आहे. याचा सर्वात जास्त फायदा खासगी सावकारांनी घेतला आहे. १ ते २ लाख रूपये उसणार घेवून जमिनीच्या रजिस्ट्री मारण्याचे प्रकार वाढले आहे.
याकडे पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. शासनाने खासगी सावकारीचा नाश करण्यासाठी कठोर कायदे केले, पण या कायद्याचा उपयोग होताना दिसत नाही तरी पोलीस प्रशासनाने अशा खासगी सावकारांचा शोध घेवून शेतकऱ्यांची पिळवणूक करणाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. (वार्ताहर)