लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : तालुक्यातील तामसवाडी नदी घाटातून पुन्हा रेती तस्करांनी रेतीचा प्रचंड उपसा करणे सुरु केले आहे. दररोज ४० ते ५० ट्रक रेती येथून जात आहे. महसूल प्रशासन येथे गप्प दिसत असून रेतीचे टिप्पर वाहतूक करताना सर्रास दिसतात, परंतु वाहतूक व्यवस्था पाहणारा विभागाचे दुर्लक्ष दिसत आहे. तालुक्यातील लहान-मोठ्या नदीघाटावर रेती माफियांचे राज्य सुरु असल्याचे चित्र आहे.तुमसर तालुक्यातून बावनथडी व वैनगंगा या प्रमुख नद्या वाहतात. दोन्ही नद्यांचे पात्र रेतीने समृद्ध आहे. तस्करांची वक्रदृष्टी येथील रेतीवर पडली. अर्थकारण येथे दडल्याने मोठा पैसा यातून उभा केला जात आहे.तामसवाडी घाट रेती तस्करांकरिता मोकळे सोडल्याचे चित्र येथे आहे. २४ तासात ४० ते ५० ट्रक रेती येथून काढली जात आहे. लॉकडाऊनचे कामात व्यस्त असल्याचे प्रशासन सांगते. परंतु रेतीची लूट सर्रास सुरु असताना अधिकाऱ्यांनी येथे मौन धारण केले आहे.बावनथडी व वैनगंगा नदीला रेती तस्करांनी पोखरून टाकले आहे. नियम धाब्यावर बसवून घाट लिलाव नसताना दिवसाढवळ्या व रात्री नदीचे विद्रुपीकरण सुरु आहे.ग्रामीण परिसरात नदी काठावरील गावात रेती माफियांची प्रचंड दहशत आहे. हा घाट माझा, तो घाट तुझा असे घाट रेती तस्करांनी वाटून घेतले आहेत. अधिकाऱ्यांचा आशीर्वादाशिवाय हे शक्य नाही. सर्वसामान्यांना कायदा व नियम सांगणारे अधिकारी येथे मूग गिळून गप्प आहेत. रेती माफियांच्या दहशतीचा फायदा येथे अधिकाºयांनाही मिळत आहे. रेती चोरीची तक्रार करण्यास कुणीच पुढे येत नसल्याने अधिकाºयांचे येथे फावत आहे. प्रशासनाला सांगितल्यावर लेखी तक्रार करा असे सर्व सामान्यांना सांगितले जाते. त्यामुळे कुणीच पुढे येत नाही.चोरीच्या रेतीचा लिलावतामसवाडी घाटावर महसूल प्रशासनाने केवळ २०० ते ३०० ब्रास रेती जप्ती केली. परंतु हा रेतीसाठा वाढवून देण्याची फिल्डींग रेती माफियांनी भंडारा येथे खनिकर्म विभागाने लावण्याची माहिती आहे. रितसर जप्तीची रेती घेतल्यावर नदी पात्रातून रेती काढण्याचा गोरखधंदा मागील अनेक महिन्यापासून सुरु आहे. याबाबत महसूल व खनिकर्म विभागाला माहिती आहे हे विशेष.
तामसवाडी नदी पात्रातून रेतीचा अहोरात्र अवैध उपसा सुरुच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2020 05:01 IST
तामसवाडी घाट रेती तस्करांकरिता मोकळे सोडल्याचे चित्र येथे आहे. २४ तासात ४० ते ५० ट्रक रेती येथून काढली जात आहे. लॉकडाऊनचे कामात व्यस्त असल्याचे प्रशासन सांगते. परंतु रेतीची लूट सर्रास सुरु असताना अधिकाऱ्यांनी येथे मौन धारण केले आहे. बावनथडी व वैनगंगा नदीला रेती तस्करांनी पोखरून टाकले आहे. नियम धाब्यावर बसवून घाट लिलाव नसताना दिवसाढवळ्या व रात्री नदीचे विद्रुपीकरण सुरु आहे.
तामसवाडी नदी पात्रातून रेतीचा अहोरात्र अवैध उपसा सुरुच
ठळक मुद्देबावनथडी, वैनगंगा नदीपात्र असुरक्षित। जप्तीच्या रेतीवर रेती तस्करांच्या उड्या