धुटेरा येथील नदीपात्रातून रेतीचे अवैध उत्खनन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:37 IST2021-05-11T04:37:57+5:302021-05-11T04:37:57+5:30
धुटेरा येथील रेतीघाटातून सर्रास रेतीचे उत्खनन सुरू आहे. दर दिवशी ६० ट्रॅक्टर रेती चोरली जाते. परंतु त्याकडे अजूनही महसूल ...

धुटेरा येथील नदीपात्रातून रेतीचे अवैध उत्खनन
धुटेरा येथील रेतीघाटातून सर्रास रेतीचे उत्खनन सुरू आहे. दर दिवशी ६० ट्रॅक्टर रेती चोरली जाते. परंतु त्याकडे अजूनही महसूल प्रशासनाचे लक्ष गेले नाही का, असा प्रश्न निर्माण होत आहे. त्यामुळे राज्य शासनाचा महसूल बुडत आहे. मागील काही दिवसापासून हा प्रकार राजरोसपणे सुरू आहे. नदीपात्रात खोल खड्डे पडले असून, ट्रॅक्टर चालकांची मुजोरीसुद्धा सुरू आहे. आमचे कुणी काहीच करू शकत नाही, या तोऱ्यात सध्या ते वागत आहेत. त्यांना येथे अभय असल्याचे दिसून येत आहे.
रेतीचा उपसा केल्यानंतर स्थानिक स्तरावर काही प्रमाणात येथे विक्री करण्यात येते, तर मोठ्या प्रमाणात शहराकडे विक्री करण्यात येत आहे. संघटित रूपात येथे चोरीचाच धंदा सुरू आहे. भरारी पथकसुद्धा याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र आहे.