नदीपात्रातील रेतीचे अवैध उत्खनन

By Admin | Updated: June 4, 2015 00:32 IST2015-06-04T00:32:48+5:302015-06-04T00:32:48+5:30

साकोली तालुक्यातील लवारी चुलबंद नदीच्या पात्रातील जांभुळघाट शिवारातून रेतीचे मोठ्या प्रमाणात अवैधरीत्या ...

Illegal excavation of sand in river basin | नदीपात्रातील रेतीचे अवैध उत्खनन

नदीपात्रातील रेतीचे अवैध उत्खनन

लवारी : साकोली तालुक्यातील लवारी चुलबंद नदीच्या पात्रातील जांभुळघाट शिवारातून रेतीचे मोठ्या प्रमाणात अवैधरीत्या उत्खनन होत आहे. यामुळे शासनाचा महसूल बुडत आहे.
जांभुळघाट रेतीघाटाचा लिलाव झालेले नाही. तरीही येथे मोठ्या प्रमाणात ट्रॅक्टरद्वारे रेतीचे उत्खनन व वहन होत आहे. त्यामुळे स्थानिक रस्त्याची मोठ्या प्रमाणात दैनावस्था झाली आहे.
रस्त्याची दुरूस्ती पावसाळ्यापूर्वी होणे गरजेचे असल्याने शेतकरी तथा नागरिकांना त्रास सोसावा लागत आहे. हा मुख्य मार्ग असल्याने याच रस्त्यावरून नेहमी वर्दळ असते.
या सर्व बाबी लक्षात घेता महसूल विभाग व ग्रामपंचायत प्रशासनाने या बाबीकडे कानाडोळा न करता रस्ता दुरूस्तीच्या दृष्टिने उपाययोजना कराव्या, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे. असेच चालत राहिले तर एके दिवशी रस्त्याला मोठमोठे खड्डे पडतील आणि शेतकऱ्याला या रस्त्यााने जाण्यास अडथळे निर्माण होतील. या सर्व गोष्टींचा विचार करता लवारी चुलबंद नदीपात्रातील जांभुळघाट परिसरातील अवैधरित्या रेती उत्खननावर बंदी घालावी अशी मागणी लवारी वासीयांनी केली आहे. (वार्ताहर)

चुलबंद नदीपात्रातील जांभुळघाट रेती घाटाचा लिलाव झालेला नाही. त्यामुळे आम्ही अवैध रेती उत्खननाबाबत महसूल विभागाला कळविले आहे आणि आतापर्यंत चार प्रकरणांची नोंद घेण्यात आली आहे.
- अनिल किरणापुरे
उपसरपंच, ग्रामपंचायत लवारी.

Web Title: Illegal excavation of sand in river basin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.