नियमांचे उल्लंघन करून मुरूमाचे अवैध उत्खनन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2020 05:00 AM2020-05-14T05:00:00+5:302020-05-14T05:00:54+5:30

जिल्हा परिषदेचे लघुपाटबंधारे विभागाच्या उपजिल्हा जलसंधारण अधिकारी भगत यांनी संबंधित कंत्राट कंपनीला मुरूम उत्खननाची परवानगी दिल्याची बाब उघडकीस आली आहे. या परवानगीची माहिती संबंधित विभागाच्या कार्यकारी अभियंता यांना नाही. तहसीलदार यांनाही तलावात होत असलेल्या उत्खननाची माहिती नसून, अशी कुठलीही परवानगी दिली नसल्याचे सांगितले जाते.

Illegal excavation of pimples in violation of the rules | नियमांचे उल्लंघन करून मुरूमाचे अवैध उत्खनन

नियमांचे उल्लंघन करून मुरूमाचे अवैध उत्खनन

googlenewsNext
ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : भंडारा -पवनी मार्गावरील तलावांत मातीचे ढिगारे, लघु पाटबंधारे विभागाचा कारभार

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : पवनी-भंडारा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामावर वापरण्यात येत असलेल्या मुरूमाचे अवैध उत्खनन केले जात आहेत. या नियमांना तिलांजली देवून कंत्राटदार शासनाचा कोट्यवधी रूपयांचा महसूल बुडीत आहे. याकडे परवानगी दिलेल्या जिल्हा परिषद, लघुपाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष आहे. संबंधित कंपनीला परवानगी देणाऱ्यांवर कारवाई करून या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी एका शिष्टमंळाने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
पवनी-भंडारा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. सबंधित कंत्राट कंपनीने महामार्गालगतच्या गावांमधील अनेक तलावांमधून मुरूम व मातीचे उत्खनन केले जात आहे. काही तलाव मालगुजारी, तर काही तलाव जिल्हा परिषदेच्या लघुपाटबंधारे विभागाच्या अधिकार क्षेत्रातील आहेत.
जिल्हा परिषदेचे लघुपाटबंधारे विभागाच्या उपजिल्हा जलसंधारण अधिकारी भगत यांनी संबंधित कंत्राट कंपनीला मुरूम उत्खननाची परवानगी दिल्याची बाब उघडकीस आली आहे. या परवानगीची माहिती संबंधित विभागाच्या कार्यकारी अभियंता यांना नाही. तहसीलदार यांनाही तलावात होत असलेल्या उत्खननाची माहिती नसून, अशी कुठलीही परवानगी दिली नसल्याचे सांगितले जाते.
तलावातून मुरूम, माती, गाळ काढले जातात. मात्र सदर कंपनीकडून मुरूमच काढला जात आहे. मुरूम आहे तिथेच खोदकाम केले जात आहे. संबंधित कंत्राट कंपनीने पाहिजेपेक्षा जास्त खोल १५ ते २० फूट खड्डे तलावात पाडले आहेत.
तलावाचे खोलीकरण करण्याऐवजी तलावाचे विद्रुपीकरण करण्याचा प्रकार सुरू आहे. यामुळे वन्यप्राणी व नागरिकांचा जीव धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. २५ पेक्षा अधिक तलावातून नियमांना डावलून उत्खनन सुरू आहे. उत्खननामुळे शेतकºयांना सिंचनाची सोय होणे कठीण झाले आहे. परीणामी अपघताची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
निवेदनावर जिल्हा परिषद सदस्य सुभाष आजबले, अनिल कडव, बालू ठवकर, स्वप्निल आरीकर, किरण चवळे, राजेश इसापुरे आदींच्या स्वाक्षºया आहेत.

Web Title: Illegal excavation of pimples in violation of the rules

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.