ऐतिहासिक वारसा दुर्लक्षित
By Admin | Updated: August 22, 2015 00:58 IST2015-08-22T00:58:04+5:302015-08-22T00:58:04+5:30
प्राचीन व ऐतिहासिक नगर म्हणून शासन दरबारी नोंद असलेल्या पवनी नगरात परकोट किल्ला, वैनगंगा नदीवरील विविध घाट, शेकडोच्या संख्येने असलेले मंदिर, ....

ऐतिहासिक वारसा दुर्लक्षित
अशोक पारधी पवनी
प्राचीन व ऐतिहासिक नगर म्हणून शासन दरबारी नोंद असलेल्या पवनी नगरात परकोट किल्ला, वैनगंगा नदीवरील विविध घाट, शेकडोच्या संख्येने असलेले मंदिर, उत्खननात सापडलेले बौद्ध स्तुपाचे अवशेष व गरूडध्वज पर्यटकांना खेचून घेत असतात. परंतु लोकप्रतिनिधी व प्रशासनाच्या उदासिनतेमुळे नगरातील प्राचीन व ऐतिहासिक वारसा दुर्लक्षित होत आहे. स्वातंत्र्यपूर्व काळापासून प्रसिद्ध असलेला दिवाणघाट नामशेष होण्याचे मार्गावर असून शेवटच्या घटका मोजत आहे.
वैनगंगा नदीचे तिरावर दिवाणघाट, पाणखिडकी, ताराबाईचा घाट व वैजेश्वर घाट साधारणत: तीनशे-साडेतीनशे वर्षापुर्वी बांधण्यात आलेले आहेत. पालिका प्रशासन व नगरसेवकांचे लक्ष वैजेश्वर घाटाकडे वेधल्या गेल्यामुळे पर्यटन विकास निधीमधून आतापर्यंत त्या घाटावर लक्षावधी रूपयाचा निधी खर्च करण्यात आलेला आहे. परंतू तेवढेच महत्व असलेल्या व भंडारा मार्गावरून येणाऱ्या पर्यटकांना लक्षवेधी असलेल्या घाटाच्या डागडुजीकडे देखिल पालिका प्रशासनाने लक्ष दिलेले नाही. पवनीकरांचे दृष्टीने अत्यंत जवळचा घाट असलेल्या दिवाणघाटाच्या दोनपैकी एक घाट व त्याकडे जाणारा रस्ता पुर्णत: खचलेला आहे. दुसरा मार्ग व बाजूचे बुरूज खचण्याचे मार्गावर आहे. पुराचे पाणी पायऱ्यावर आल्याने त्याठिकाणी गाळ साचलेला आहे व घाटाचे वर सपाट जमीनिवर गाजर गवत मोठ्या प्रमाणात उगवलेला आहे.
श्रीकृष्ण जन्माष्टमी, गौरी-गणपती व कार्तिक सणाचेवेळी बहुसंख्य नागरिक दिवाणघाटावर हजेरी लावत असतात. परंतु घाटाची दुरावस्था पाहुन नागरिकांत प्रशासनाविषयी रोष आहे.
गावात नको त्या रस्त्यावर सिमेंट काँक्रीटचा रस्ता मंजूर करण्यासाठी तत्पर असणाऱ्या नगरसेवकांना दिवाणघाटाचे महत्व कळलेले नाही. हे पवनीकरांचे दुदैव आहे. नामशेष होण्यापुर्वी दिवाघाटाची दुरूस्ती व्हावी, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.