महामार्गाच्या रुंदीकरणाकडे दुर्लक्ष

By Admin | Updated: August 31, 2015 00:25 IST2015-08-31T00:25:02+5:302015-08-31T00:25:02+5:30

मुजबी ते पारडी (नाका) पर्यंत राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरण खासगी कंपनीने केले. मर्यादित कालखंडाअगोदर काम पूर्ण केले.

Ignore the width of the highway | महामार्गाच्या रुंदीकरणाकडे दुर्लक्ष

महामार्गाच्या रुंदीकरणाकडे दुर्लक्ष

भौगोलिक परिस्थितीविरुद्ध कामे : अपुऱ्या नाल्या, बसस्थानक नाही, पथदिवे बंद
जवाहरनगर : मुजबी ते पारडी (नाका) पर्यंत राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरण खासगी कंपनीने केले. मर्यादित कालखंडाअगोदर काम पूर्ण केले. परिणामी कंत्राटदार व प्रशासनाच्या दुर्लक्षित धोरणामुळे रस्त्यालगत असलेली गावे समस्याने ग्रासली आहेत. यावर तोडगा लवकरात लवकर काढण्यात यावा अन्यथा माथनी टोलनाका येथे आंदोलन करण्याचा इशारा ठाणाचे जिल्हा परिषद सदस्य चंद्रप्रकाश दुरुगकर यांनी दिला आहे.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अंतर्गत अतिवर्दळीचा ठरत असलेला राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाचे एशियन महामार्ग ४७ झालेले असून रुंदीकरण मागील वर्षी खासगी कंपनीने पूर्ण केले.
दर्शन भोंदे, खरबीचे सरपंच मोथरकर, ठाणाचे सरपंच कल्पना निमकर व ग्रामपंचायत सदस्य माथनी टोलनाक्याचे व्यवस्थापक जी. एम. सी. कर्मचारी ग्रामपंचायत सदस्य उपस्थितीत गावागावातील सदस्यांनी सुमारे ६९ किलो मीटर रस्त्याची पाहणी केली. या परिसरात सोईस्कर रस्ते तयार करण्यात आलेले नाही. खरबी (नाका) रहदारीकरिता रस्ताच नाही. येथे नियमित अपघात घडत आहे. येथील रुंदीकरणात गेलेल्या घरांचा अजूनपर्यंत लाभधारकांना मोबदला मिळाला नाही.
ठाणा पेट्रोलपंप येथील दोन्ही दिशेला आयुध निर्माणीचे जुन्याच स्थळी बसस्थानक बांधावे, असे पत्र देऊनसुध्दा बसस्थानक तयार करण्यात आलेले नाही. ठाणा पेट्रोलपंप या गावाचे नामदर्शक फलक लावण्यात आलेले नाही. रहदारी दरम्यान पार्किंगची स्थिती दर्शविणारा फलक नाही. ट्रक थांबा नाही. तिन्ही गावात पथदिवे बंद राहत असतात. सर्व मुलभूत सोई जी.एम.सी.ने पूर्ण कराव्यात अशी मागणी करण्यात आली आहे.
रस्ता लगबगीने ठरवून दिलेल्या कालखंडाअगोदर अपूर्ण अवस्थेत सुरु करण्यात आला. कामाची गुणवत्ता व गावागावातील भौगोलिक परिस्थितीच्या विरुद्ध रस्त्यावरील कामे करण्यात आली.
गावालगत रस्त्यावरील पाणी हे गावाबाहेर न काढता गावातच पाणी शिरत आहे. अर्धवट नाल्यामुळे गावातील सांडपाणी वाहून जाणाऱ्या नाल्या तुडुंब भरल्या आहेत. परिणामी प्रत्यक्ष रोगराईला आमंत्रण देण्यात येत आहे.
प्रवास करणाऱ्या शाळकरी, कामगार यांना सोईचे बसस्थानक तयार करण्यात आलेले नाही. ऊन-वारा-पाऊस याची तमा न बाळगता प्रवासी रस्त्यावर बसची प्रतीक्षा करीत उभे राहत आहेत. अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.
खरबी (नाका) ठाणा पेट्रोलपंप शहापूर येथील गावांची समस्या जाणून घेण्यासाठी ठाणा जिल्हा परिषद क्षेत्राचे सदस्य चंद्रप्रकाश दुरुगकर, पंचायत समिती ठाणाचे सदस्य राजेश मेश्राम, शहापूर पंचायत समितीचे सदस्य उपस्थित होते. (वार्ताहर)जिल्हा परिषद सदस्यांनी दिला आंदोलनाचा इशारा
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ च्या रुंदीकरणाचे काम द्वितीय बिलकॉम व जे.एम.सी. यांनी केले. यात अनियमितता असून मागील आठवड्यात १२ ते १३ आॅगस्ट दरम्यान ठाणा-शहापूर-खरबी येथे अतिवृष्टी झाली. यावेळी रस्त्यालगत घरात चार फूट पाणी साचले परिणामी जनतेला लाखो रुपयांचा जीवनावश्यक वस्तूंचा फटका बसला. याला ठाणा येथील देवेंद्र किराणा दुकानाची लाखोंची साखर, डाळ, पोहे, मीठ, पीठ इत्यादी वस्तूंची नासधूस झाली. याला कारणीभूत सदर कंपनी व जे.एम.सी. असल्याममुळे याची भरपाई देण्यात यावी. शहापूर उड्डाण पुलाची विचिंग तयार करावी. अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा जिल्हा परिषद सदस्य चंद्रप्रकाश दुरुगकर यांनी दिला.

Web Title: Ignore the width of the highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.