शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

मतदान केंद्रावर पार्टी कराल तर तुम्ही नोकरी गमवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2024 12:01 IST

अधिकारी, कर्मचाऱ्यांनो सावधान : मतदान प्रक्रियेसाठी निवडणूक विभाग सज्ज

लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : जिल्ह्यातील तीनही विधानसभा मतदारसंघांसाठी २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे. सर्वच मतदान केंद्रांवर अधिकारी, कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. नियुक्त अधिकारी, कर्मचाऱ्यांपैकी कोणी मतदान केंद्रावर पार्टी केली तर त्यावर निलंबनाची कारवाई करण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील सर्वच मतदारसंघांत महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत होत आहे. इतर पक्ष आणि अपक्ष उमेदवारही निवडणूक रिंगणात आहेत. एकूण ५० उमेदवारांनी या निवडणुकीत आपले नशीब आजमाविण्यासाठी उडी घेतली आहे. निवडणुकीत आदर्श आचारसंहितेचे पालन व्हावे, यासाठी निवडणूक विभाग दक्षता घेत आहे. आचारसंहिता भंगाचे गुन्हे दाखल करण्यात आले असून, चेकपोस्टवर तपासणी मोहीमही राबविली जात आहे. 

शिवाय मतदान केंद्रांवर अधिकारी, कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. ते एक दिवस अगोदरच केंद्रावर जाणार आहेत. या अधिकारी, कर्मचाऱ्यांना विविध सूचना देण्यात आल्या आहेत. सूचनांचे उल्लंघन करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. 

११६७ मतदान केंद्र जिल्ह्यात 

  • जिल्ह्यातील तीनही विधानसभा मतदारसंघांत ११६७ केंद्रे आहेत.
  • भंडारा विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक ४३५ मतदान केंद्रे आहेत.

मागील निवडणुकीत काही केंद्रांवर धिंगाणा तुमसर व लाखांदूर तालुक्यांतील एक ते दोन मतदान केंद्रांवर गत निवडणुकीत काहीसा तणाव निर्माण झाला होता. तेथेही बंदोबस्त राहणार आहे. सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सूचनांचे पालन करावे आहे. निवडणूक विभागाच्या वतीने निवडणूक कामासाठी अधिकारी, कर्मचारी नियुक्त केले आहेत. ते एक दिवस अगोदर केंद्रावर जाणार आहेत.

सर्व केंद्रांवर सीसीटीव्हीची नजर जिल्ह्यातील सर्वच मतदान केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर राहणार असून, पोलिसांचाही बंदोबस्त राहणार आहे

३ दिवस ड्राय डे... 

  • मतदान प्रक्रियेदरम्यान दारू पिणाऱ्यांमुळे कायदा-सुव्यवस्था निर्माण होऊ शकते.
  • ही बाब पाहता मतदान प्रक्रियेदरम्यान तीन दिवस ड्राय डे राहणार आहे.

 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Electionनिवडणूक 2024bhandara-acभंडारा