कामावर न घेतल्यास आंदोलनाचा इशारा
By Admin | Updated: May 12, 2017 01:54 IST2017-05-12T01:54:54+5:302017-05-12T01:54:54+5:30
गोसीखुर्द धरणावर सुरक्षा रक्षक म्हणून मागील १० वर्षापासून कार्यरत असणाऱ्या २५ प्रकल्पग्रस्तांना धरणविभागाच्या अधिकाऱ्यांनी कामावरून काढले आहे.

कामावर न घेतल्यास आंदोलनाचा इशारा
लोकमत न्यूज नेटवर्क
पवनी : गोसीखुर्द धरणावर सुरक्षा रक्षक म्हणून मागील १० वर्षापासून कार्यरत असणाऱ्या २५ प्रकल्पग्रस्तांना धरणविभागाच्या अधिकाऱ्यांनी कामावरून काढले आहे. हे काम माथाडी बोर्डाला देूवन बोर्डाचे १५ व्यक्त्ी या कामावर घेतले आहेत. २५ प्रकल्पग्रस्त व्यक्तींच्या कुटूंबावर उपासमारीची पाळी आली आहे. यातील एका व्यक्तीचा मानसीक धक्का बसून दोन दिवसापुर्वी मृत्यू झाला.
या प्रकल्पग्रस्तांना आठ दिवसात कामावर परत न घेतल्यास धरणावर आंदोलन करण्याचा ईशारा शासनाला दिला आहे. गोसीखुर्द प्रकल्पग्रस्तांनी धरणाच्या कामाकरीता आपली शेती, घर-दार सर्व दिले. आता त्यांच्याकडे काहीही शिल्लक नाही. सरकारने कुटूंबातील एकाला नोकरी देण्याचे आश्वासन दिले. पण हजारो ्रकल्पग्रस्त युवक नोकऱ्यासाठी फिरत आहेत. पण नोकऱ्या मिळत नाही.सरकारी नोकऱ्या मिळत नसल्यामुळे १० वर्षापुर्वी २५ प्रकल्पग्रस्तांनी आपल्या कुटूंबाच्या उदरनिर्वाहासाठी कंत्राटी, पद्धतीवर गोसीखुर्द धरणावर नोकरी पत्करली. त्यामुळे त्यांचे कुटूंब चालवायला थोडीफार मदत होवू लागली. धरण विभागाचे अधिकारीही या प्रकल्पग्रस्तांना तुम्हाला कोणत्याही स्थितीत कामावरून काढणार असल्याचे सांगत होते व यांना न्यायालयात जाण्यापासून परावृत्त करीत होते. या प्रकल्पग्रस्तांनी त्यांची माथाडी बोर्डात नोंदणी करण्यासाठी सर्व प्रयत्न केले. पण माथाडी बोर्डाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांनी नोंदणी होवू दिली नाही. माथाडी बोर्डाला देवून त्यांचे १५ व्यक्ती कामावर घेतले व २५ प्रकल्पग्रस्तांना कामावरून केले आहे. याची माहिती शेवटच्या क्षणापर्यंत या प्रकल्पग्रस्तांना कामावरून केले आहे. याची माहिती शेवटच्या क्षणापर्यंत या प्रकल्पग्रस्तांना होवू दिली नाही. कामावरून काढल्यामुळे या २५ व्यक्तीच्या कुटूंबावर उपासमारीची वेळ आली आहे.