ताप न आल्यास विश्वास बसे ना; लस खरी की खाेटी ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:42 IST2021-09-08T04:42:25+5:302021-09-08T04:42:25+5:30
जिल्ह्यात सध्या स्थितीत काेविशिल्ड आणि काेव्हॅक्सिन या लसी दिल्या जात आहेत. काेविशिल्ड घेणाऱ्यांना ताप आदी लक्षणे दिसतात; परंतु काेव्हॅक्सिन ...

ताप न आल्यास विश्वास बसे ना; लस खरी की खाेटी ?
जिल्ह्यात सध्या स्थितीत काेविशिल्ड आणि काेव्हॅक्सिन या लसी दिल्या जात आहेत. काेविशिल्ड घेणाऱ्यांना ताप आदी लक्षणे दिसतात; परंतु काेव्हॅक्सिन घेणाऱ्यांना त्रास कमी झाल्याचे दिसून येते. त्यामुळे ताप न आल्यास घेतलेली लस परिणामकारक आहे की नाही, असा प्रश्न पडताे. नागरिकांमध्ये निर्माण झालेला हा संभ्रम निराधार असून दाेन्ही लस परिणामकारक असल्याचे डाॅक्टरांचे मत आहे.
नागरिकांनी वेळेत लसीचे दाेन्ही डाेस घ्यावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
काेविशिल्डचा अधिक त्रास
जिल्ह्यात काेविशिल्ड आणि काेव्हॅक्सिन लस दिल्या जात आहेत. काेविशिल्ड घेतलेल्यांना त्रास हाेत असल्याचे दिसून येते. काेव्हॅक्सिन घेणाऱ्यांना क्वचित त्रास हाेतो; परंतु त्रास हाेणे न हाेणे हे शरीराच्या परिणामकारकतेवर अवलंबून असते.
काेट
लसीनंतर काहीच झाले नाही
मी काेविशिल्ड लसीचा पहिला डाेस घेतला. मला कुठलाच त्रास झाला नाही. लस घेतल्यानंतर ताप येईल, असे सांगितले जात हाेते; परंतु अंगदुखीचा त्रास साेडला तर काेणताच त्रास झाला नाही. लसीकरण पूर्णत: सुरक्षित आहे. मी घेतली, तुम्हीही घ्या.
-रूपेश काळे, भंडारा
लसीचे दाेन्ही डाेस घेतले. पहिला डाेस घेतल्यानंतर थाेडी कणकण जाणवली. दुसऱ्या दिवशी बरे वाटायला लागले. दुसरा डाेस घेतल्यानंतर काहीच त्रास झाला नाही. त्यामुळे लसीकरणाविषयीची मनातील भीती नाहीशी झाली. तुम्हीदेखील लस घेऊन काेराेनापासून स्वत:चे रक्षण करा.
-महेश नंदनवार, भंडारा
काेट
प्रत्येकाच्या शरीराची परिणामकारकता वेगवेगळी असते. काेणाला ताप येताे तर कुणाला येत नाही. याचा अर्थ लसीकरणानंतर त्रास झाला तरच परिणामकारक आहे, असे अजिबात नाही. दाेन्ही लस परिणामकारक असून सुरक्षित आहेत.
- डाॅ. रियाज फारुखी
जिल्हा शल्यचिकित्सक, भंडारा
बाॅक्स
पहिला डाेस : ६६२८३४
दुसरा डाेस : १८६४६४
काेविशिल्ड ३७१२०४
काेव्हॅक्सिन ४७८०९४