संघटित झाल्यास विकास शक्य
By Admin | Updated: August 12, 2015 00:32 IST2015-08-12T00:32:24+5:302015-08-12T00:32:24+5:30
आदिवासी समाजातील सर्व समाजबांधवांनी संघटित होणे काळाची गरज आहे. जोपर्यंत संघटित होणार नाही,

संघटित झाल्यास विकास शक्य
आदिवासी दिवस सोहळा : शेषराव मडावी यांचे प्रतिपादन
अड्याळ : आदिवासी समाजातील सर्व समाजबांधवांनी संघटित होणे काळाची गरज आहे. जोपर्यंत संघटित होणार नाही, तोपर्यंत आदिवासी समाज बांधवांचा विकास किंवा उद्धार होणार नाही, असे आदिवासी साहित्यिक शेषराव मडावी यांनी प्रतिपादन केले.
संयुक्त राष्ट्र संघटनेच्या मान्यतेनुसार ९ आॅगस्ट हा जागतिक आदिवासी दिवस म्हणून साजरा केला जातो. याचे आयोजन अड्याळ येथील आदिवासी विद्यार्थी संघ व वीर बिरसा मुंडा स्मारक समितीच्या वतीने करण्यात आले होते.
मंडईपेठ, सुलका माता मंदिराच्या पटांगणावर विविध स्पर्धा, बोली भाषा, साहित्य, संस्कृतीवर कार्यक्रम घेण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शेषराव मडावी तर उद्घाटक नामदेवराव सय्याम हे होते. यावेळी रवी कोडापे, राजन कोडापे, गुलाबराव करंजेकर, माजी सरपंच प्रकाश मानापुरे, नंदलाल मेश्राम, भरत मडावी, तलमले यांची प्रामख्याने उपस्थिती होती.
दरम्यान, आदिवासी समाजबांधवांनी गावातील मुख्य मार्गाने रॅली काढली. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी आशिक नैतामे, मिथुन कोडापे, अंकित काटेखाये, अनिल कोडापे, आतिश कोडापे, आदिवासी विद्यार्थी संघटनेचे सहकार्य लाभले. (वार्ताहर)