विद्यार्थ्यांमध्ये क्षमता ओळखून शिक्षण द्यावे

By Admin | Updated: February 16, 2015 00:41 IST2015-02-16T00:41:25+5:302015-02-16T00:41:25+5:30

नामांतरण म्हणजे पहिला टप्पा संपवून दुसऱ्या टप्प्यात प्रवास करणे होय. पीएसएस महाविद्यालयाचे नामांतरण डॉ. एल.डी.बलखंडे कॉलेज आॅफ आर्टस अ‍ॅन्ड कॉमर्स पवनी असे करण्यात आले.

Identify the ability of students to learn | विद्यार्थ्यांमध्ये क्षमता ओळखून शिक्षण द्यावे

विद्यार्थ्यांमध्ये क्षमता ओळखून शिक्षण द्यावे

पवनी : नामांतरण म्हणजे पहिला टप्पा संपवून दुसऱ्या टप्प्यात प्रवास करणे होय. पीएसएस महाविद्यालयाचे नामांतरण डॉ. एल.डी.बलखंडे कॉलेज आॅफ आर्टस अ‍ॅन्ड कॉमर्स पवनी असे करण्यात आले. विद्यापीठाने नामांतरणाला मंजूरी दिलेली आहे. डॉ. बलखंडे यांनी ३० वर्षापूर्वी वंचितांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी पवनी नगरात पहिले महाविद्यालय सुरु केले. ग्रामीण भागातील हजारो विद्यार्थ्यांना लाभ झाला, असे सांगून ग्रामीण विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड क्षमता आहे, ती ओळखून योग्य दिशा देण्याचे कार्य प्राध्यापकांनी करावे, असे प्रतिपादन नागपूर विद्यापीठाच प्र-कुलगुरु डॉ.मुरलीधर चांदेकर यांनी केले.
प्रवरसेन शिक्षण संस्था नागपूर द्वारा संचालीत पीएसएस महाविद्यालयाचे नामांतरणप्रसंगी ते उद्घाटक म्हणून बोलत होते. ते म्हणाले, बदल असो वा परिवर्तन त्यात जीवंतपणा असावा. कोऱ्या पाटीवर लिहिने सोपे असते. परंतु पाटीवर लिहिलेले मिटवून दुसरे नाव लिहिणे त्यापेक्षा कठीण असते. त्यामुळे बदलणाऱ्या काळाजी गरज लक्षात घेवून शिक्षण पध्दतीत राखानने, पारखने व नियोजन करण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांचे सुप्त गुण ओळखून त्यांना योग्य मार्ग दाखवा तसेच डॉ. बलखंडे यांचे अपूर्ण राहिलेले कार्य पूर्ण करण्याचा संकल्प महाविद्यालयाने करावा, असे आवाहन केले. अध्यक्षस्थानी प्रवरसेन शिक्षण संस्थेच्या अध्यक्ष प्रा. डॉ. दीपा बडगे, विशेष अतिथी म्हणून संस्थेचे सचिव मिलिंद बलखंडे, आमदार अ‍ॅड़ रामचंद्र अवसरे, नगराध्यक्ष रजनी मोटघरे उपस्थित होते. यावेळी संस्थेच्या उपाध्यक्षा सुहासिनी बलखंडे, सहसचिव फॅमीलीनी बलखंडे, सदस्य शरद तिरपुडे, अस्मिता बलखंडे, राज फुदाले, डॉ. संजय कानगे, अ‍ॅड़ बावने, प्रा. रेखा लाडे व प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते. प्रास्ताविक प्रभारी प्राचार्य डॉ. गजानन लांबे यांनी केले. वनस्पती शास्त्रज्ञ डॉ. बलखंडे यांच्या कार्याचा गौरव करुन ते लेखक व कवीसुध्दा होते असा उल्लेख केला. संचालन प्रा. नंदकिशोर सिंगाडे व प्रा. विलास मेश्राम यांनी केले. आभारप्रदर्शन प्रा. भगवान शोभने यांनी केले. विद्यार्थींनींनी विद्यापीठ गित व स्वागत गिताचे गायन केले. श्रेया खापर्डे यांनी गणेश वंदना नृत्य सादर केले. संस्थेच्या वतीने अतिथींचा स्मृतीचिन्ह देवून गौरव करण्यात आला तसेच प्राचार्य जी.एस.लांबे, प्रा.भाजीखाये, प्रा. कोसमकर, संगित शिक्षण नाना जाधव यांचा भेटवस्तू देवून डॉ. मुरलीधर चांदेकर यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. अतिथींच्या हस्ते मिलिंद वार्षिकांकाचे विमोचन करण्यात आले. उद्घाटन समारंभानंतर विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.(तालुका प्रतिनिधी)

Web Title: Identify the ability of students to learn

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.