शहरं
Join us  
Trending Stories
1
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
2
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
3
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
4
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
5
६ धावांत ४ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
6
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
7
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
8
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
9
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
10
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
11
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
12
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
13
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
14
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
15
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
16
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
17
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
18
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
19
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
20
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...

बिडीओंची ‘स्वच्छता ही सेवा’ ठरली आदर्श

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2017 11:38 PM

राबविण्यात येणाºया स्वच्छता ही सेवा या अभियानाची पाहणी करण्यासाठी पवनीच्या खंडविकास अधिकारी अनिता तेलंग व आरोग्य विस्तार अधिकारी आर.एस. पाटील यांनी....

ठळक मुद्देस्वच्छता अभियान : अधिकाºयांनी कोंढा गावातील रस्ते, थोर पुरुषांचे पुतळे केले स्वच्छ

चरणदास बावणे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोंढा (कोसरा) : राबविण्यात येणाºया स्वच्छता ही सेवा या अभियानाची पाहणी करण्यासाठी पवनीच्या खंडविकास अधिकारी अनिता तेलंग व आरोग्य विस्तार अधिकारी आर.एस. पाटील यांनी कोंढा गावाला भेट देऊन स्वच्छतेविषयी कुटुंब भेट व गावातील थोर पुरूषांचे पुतळे स्वत: स्वच्छ करीत पाण्याने धुऊन काढले.नागरिकांना स्वच्छतेची सवय लागावी लोकसहभागातून श्रमदान करून परिसर स्वच्छ व्हावा, शौचालय स्वच्छ राहावे यासाठी स्वच्छता ही सेवा अभियान ग्रामपंचायत कोंढातर्फे राबविण्यात येत आहे. यासाठी सरपंच शिला देविदास कुर्झेकर, ग्रामविकास अधिकारी एम.ए. बावणकर, उपसरपंच धनराज जांभूळकर व ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी गावात जाऊन स्वच्छतेविषयी मार्गदर्शन व सभा घेत आहेत. या अभियानाची पाहणी करण्यासाठी २० सप्टेंबरला पवनी पं.स. च्या खंडविकास अधिकारी अनिता तेलंग यांनी कोंढा गावाला भेट दिली. त्यांच्या सोबत आरोग्य विस्तार अधिकारी आर.एस. पाटील व कर्मचारी होते. त्यांनी सरपंच शिला देविदास कुर्झेकर, उपसरपंच धनराज जांभूळकर, ग्रामविकास अधिकारी एम.ए. बावनकर व ग्रामपंचायत सदस्यांना घेऊन गावातील सार्वजनिक ठिकाणाला भेट दिली. हनुमान मंदिरासमोर हातपंपाच्या आजुबाजुचा परिसर खंडविकास अधिकारी तेलंग स्वत: स्वच्छ केला. तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुतळ्याची पाणी घालून साफसफाई केली. कुटुंबांना भेट देऊन शौचालयाची पाहणी केले ते स्वच्छ करून दिले. अनेक शौचालयाचे दरवाजे त्यांनी लावून दिले. या कार्यामुळे अनेक गावकरी प्रभावित झाले. खंड विकास अधिकारी तेलंग यांनी स्वत: मंदिरासमोरील कचरा गोळा केला आणि एक आदर्श करून दिला. स्वच्छतेसाठी जनजागृती करण्यासाठी त्यांनी केलेल्या कार्याचे गावकरी कौतूक करीत होते. स्वच्छतेची चळवळ गावात बळकट करण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांची रॅली गावात काढण्यात येणार असल्याचे सरपंच शिला कुर्झेकर यांनी सांगितले. स्वच्छतेला प्राधान्य देत बीडीओ अनिता तेलंग यांनी कोंढा गावाला भेट देऊन स्वत: सार्वजनिक ठिकाणी कचरा गोळा केला, राष्ट्रसंताच्या पुतळ्याची स्वच्छता केली. शौचालय स्वच्छ केले. यामुळे निश्चित गावातील लोकात स्वच्छतेची चळवळ निर्माण होऊन गावकºयांना स्वच्छतेची सवय लागण्यास मदत होईल. गावात सार्वजनिक ठिकाणी स्वत: स्वच्छता मोहिम राबविल्यानंतर ग्रामपंचायतमध्ये त्यांनी ग्रामपंचायत सदस्य व गावकºयांना मार्गदर्शन केले. यावेळी नागरिकांनी स्वच्छतेची चळवळ बळकट करून गावात स्वच्छतेला प्राधान्य द्यावे. आरोग्य निरोगी राहण्यासाठी यास प्रथम प्राधान्य देण्याचे आवाहन केले. संचालन ग्रामविकास अधिकारी एम.ए. बावनकर यांनी तर आभार अरुण कुर्झेकर यांनी मानले.