लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : साकोली शहरात मंगळवारी सकाळी घडलेल्या एका धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ उडाली. नर्सिंग कोर्सचे शिक्षण घेणारी प्रेरणा शामराव खोब्रागडे (१९, पंचमटी, ता. सडक अर्जुनी, जि. गोंदिया) हिने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही युवती मागील दीड वर्षांपासून साकोली येथील पंचशिल वार्डमध्ये राहणारे आपले मामा कन्नन मनीकंम मुदलियार यांच्या घरी राहून नर्सिंगचे शिक्षण घेत होती. मंगळवारी सकाळी आठच्या सुमारास ती घरातील एका खोलीत गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली.
प्राथमिक माहितीनुसार, प्रेरणा हिने सुसाईड नोट लिहून ठेवली असून त्यात तिने स्पष्टपणे ‘मी स्वतः आत्महत्या करते’ असा उल्लेख केल्याचे निदर्शनास आले आहे.