दहावीच्या इंग्रजी पेपरमध्ये चुकाच चुका

By Admin | Updated: March 18, 2015 00:45 IST2015-03-18T00:45:55+5:302015-03-18T00:45:55+5:30

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळातर्फे यावर्षी ७ मार्चला घेतलेल्या इंग्रजी (तृतीय भाषा)च्या पेपरमध्ये चुका आढळल्या आहेत.

I have not had a mistake in the 10th standard English paper | दहावीच्या इंग्रजी पेपरमध्ये चुकाच चुका

दहावीच्या इंग्रजी पेपरमध्ये चुकाच चुका

भंडारा : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळातर्फे यावर्षी ७ मार्चला घेतलेल्या इंग्रजी (तृतीय भाषा)च्या पेपरमध्ये चुका आढळल्या आहेत. त्यामुळे अनेक विद्यार्थी संभ्रमात पडले असून त्या प्रश्नांच्या गुणदानाविषयी प्रश्न निर्माण झाला आहे.
इंग्रजीचा पेपर ए,बी,सी,डी असा चार संचामध्ये निघतो. संच सी मध्ये प्र. १ (ए) मध्ये ए ४ मधील दुसरा उपप्रश्न लँग्वेज स्टडी चा आहे. यामध्ये प्रश्नार्थक वाक्याचे विधानार्थी बनविताना एकूण ४ पर्यायांपैकी एक निवडायचा आहे. परंतु दिलेल्या पर्यायांपैकी (ए) व (बी) ही दोन्ही उत्तरे बरोबर असू शकतात तेव्हा विद्यार्थ्यांनी कोणता पर्याय लिहावा हा संभ्रम आहे.
तसेच संच सी मध्ये प्र. १ (बी) मध्ये, बी ४ मधील दुसरा उपप्रश्न पॅसिव्ह व्हाईसचा आहे. पर्याय (सी) हा बरोबर आहे. परंतु उत्तरातील वाक्यात द च्या ऐवजी ए आहे. त्यामुळे सुद्धा विद्यार्थ्यांची गोंधळाची अवस्था झाली. त्याचप्रमाणे प्र. २ ए हा सर्व संचाकरिता सारखाच आहे. या प्रश्नातील ए३ मध्ये दिलेल्या ४ शब्दांना पॅसेज मधून विरुद्धार्थी शब्द लिहा असा प्रश्न विचारला आहे. परंतु (।।) मधील अनकुक्ड या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द पॅसेजमध्ये कुठेही आलेला नाही. या प्रश्नाच्या वेळी सुद्धा विद्यार्थी गोंधळले. तसेच संच ए मध्ये प्र. क्र. ४ मधील ए२ या उपप्रश्नामध्ये खालील शब्दाचे वर्गीकरण करा असा आहे. परंतु वर्गीकरण करावयाचे शब्द प्रश्नावली दिलेले नाहीत. म्हणजेच जो प्रश्न विचारला त्यामध्ये त्रुटी आहे.
साडेचार मार्काची प्रश्नपत्रिका त्रुटीपूर्ण वा चुकीची आहे. वरील प्रश्न चुकीचे आहेत, असा दावा मासळ येथील सुबोध विद्यालयाचे इंग्रजी शिक्षक गिरीधर चारमोडे यांनी केला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: I have not had a mistake in the 10th standard English paper

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.