पती- पत्नीच्या भांडणात मुलावर विळ्याने हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:36 IST2021-05-10T04:36:16+5:302021-05-10T04:36:16+5:30
सुमित सुखदेव वाणी (१४) असे जखमी मुलाचे नाव आहे. सुखदेव महादेव वाणी (३८) आणि पत्नी सुषमा सुखदेव वाणी (३५) ...

पती- पत्नीच्या भांडणात मुलावर विळ्याने हल्ला
सुमित सुखदेव वाणी (१४) असे जखमी मुलाचे नाव आहे. सुखदेव महादेव वाणी (३८) आणि पत्नी सुषमा सुखदेव वाणी (३५) यांच्यात भांडण सुरू हाेते. वीटभट्टीच्या कामावरून पती आल्यावर आंबे खात असताना आंब्याने पाेट भरते काय, असे सुषमाने म्हटले. त्यावरून या दाेघात कडाक्याचा वाद सुरू झाला. तू काल दिवसभर कुठे हाेती, असे पतीने विचारले. त्यावेळी मुलगा सुमित भांडण साेडविण्यासाठी मधात पडला. त्यावेळी सुखदेवने तू नेहमी आपल्या आईकडून बाेलताेस, असे म्हणत त्याच्यावर विळ्याने हल्ला केला. यात त्याच्या डाव्या हाताला जबर दुखापत झाली.
या प्रकरणाने घाबरलेल्या सुषमाने पवनी पाेलीस ठाणे गाठले. त्यावरून पाेलिसांनी पती सुखदेवविरुद्ध गुन्हा दाखल केला. जखमी सुमितवर पवनीच्या रुग्णालयात उपचार करण्यात आले आहे. ठाणेदार जगदीश गायकवाड यांच्या मार्गदर्शनात अधिक तपास हवालदार चुटे करीत आहे. तूर्तास आराेपीला अटक झाली नव्हती.