पतीने पत्नीवर केला चाकूने प्राणघातक हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:40 IST2021-08-17T04:40:57+5:302021-08-17T04:40:57+5:30

तुमसर: जेवण देत नाही, या कारणामुळे संतप्त झालेल्या पतीने पत्नीवर चाकूने प्राणघातक हल्ला केला. पतीने पत्नीवर चाकूने पाच ...

Husband stabs wife | पतीने पत्नीवर केला चाकूने प्राणघातक हल्ला

पतीने पत्नीवर केला चाकूने प्राणघातक हल्ला

तुमसर: जेवण देत नाही, या कारणामुळे संतप्त झालेल्या पतीने पत्नीवर चाकूने प्राणघातक हल्ला केला. पतीने पत्नीवर चाकूने पाच वार केले. सध्या तिच्यावर भंडारा येथील शासकीय जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सदर घटना देव्हाडी येथे गांधी वार्डात घडली.

गणेश देवगडे (५२) रा गांधी वाॅर्ड देव्हाडी असे पतीचे नाव आहे. गणेश याने आपल्या पत्नीला भोजन मागितले. भोजन का देत नाही म्हणून संतप्त झालेल्या पती गणेश याने सुनीतावर चाकूने पाच वार केले. त्यात ती गंभीर जखमी झाली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या सुनीताला भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

आरोपी पती घटनेनंतर पसार झाला. तुमसर पोलिसांनी गणेशवर भादंवि ३२४, ५०४, ५०६ अंतर्गत गुन्हा दाखल केला असून, तपास पोलीस निरीक्षक रामेश्वर पिपरेवार यांच्या मार्गदर्शनात देव्हाडी पोलीस दूर केंद्रप्रमुख तुकाराम गभने, पोलीस शिपाई खराबे, जितू मल्होत्रा करीत आहेत.

Web Title: Husband stabs wife