पत्नीच्या मृत्यूनंतर नैराश्यातून पतीची नदीत उडी घेऊन आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:23 IST2021-06-28T04:23:59+5:302021-06-28T04:23:59+5:30

भंडारा : दीर्घ आजाराने पत्नीचा मृत्यू झाल्यानंतर अवघ्या काही तासांतच पतीनेही नैराश्यातून वैनगंगा नदीत उडी घेऊन आत्महत्या केली. राजेश ...

Husband jumps into river out of depression after wife's death | पत्नीच्या मृत्यूनंतर नैराश्यातून पतीची नदीत उडी घेऊन आत्महत्या

पत्नीच्या मृत्यूनंतर नैराश्यातून पतीची नदीत उडी घेऊन आत्महत्या

भंडारा : दीर्घ आजाराने पत्नीचा मृत्यू झाल्यानंतर अवघ्या काही तासांतच पतीनेही नैराश्यातून वैनगंगा नदीत उडी घेऊन आत्महत्या केली. राजेश रमेश चुटे (वय ४८) असे मृताचे नाव आहे. ही घटना भंडारा शहरातील पटेलपुरा वाॅर्डातील आहे.

माहितीनुसार राजेश यांची पत्नी गत तीन महिन्यांपासून आजारी होती. यातच ते विवंचनेत असायचे. दरम्यान, शनिवारी दीर्घ आजाराने त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाला. हा मानसिक आघात राजेश यांना सहन झाला नाही. पत्नीच्या मृत्यूमुळे ते नैराश्यात गेले. यात त्यांनी सरळ वैनगंगा नदी गाठून पाण्यात उडी घेतली. यात ते बुडाल्याने त्यांचा करुण अंत झाला. घटनेची माहिती मिळताच नातेवाईक तथा पोलीस ताफा घटनास्थळी दाखल झाला. मनीष रमेश चुटे यांच्या तक्रारीवरून भंडारा पोलिसांनी मर्ग दाखल केला आहे. मृतक राजेश यांच्या मागे एक मुलगा, भाऊ तसेच मोठा आप्तपरिवार आहे. या घटनेने परिसरात शोक व्यक्त करण्यात येत आहे. तपास सहायक पोलीस निरीक्षक नेवसे करीत आहेत.

Web Title: Husband jumps into river out of depression after wife's death