घर काेसळून पती-पत्नी गंभीर जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:22 IST2021-07-23T04:22:09+5:302021-07-23T04:22:09+5:30
शालिक लहू बारसागडे (वय ७२), शाळू शालिक बारसागडे (६७) असे जखमी पती-पत्नीचे नाव आहे. साेनेगाव बुटी येथे त्यांचे घर ...

घर काेसळून पती-पत्नी गंभीर जखमी
शालिक लहू बारसागडे (वय ७२), शाळू शालिक बारसागडे (६७) असे जखमी पती-पत्नीचे नाव आहे. साेनेगाव बुटी येथे त्यांचे घर आहे. सततच्या पावसाने घर खिळखिळे झाले हाेते. गुरुवारी पहाटे अचानक संपूर्ण घर काेसळले. त्यावेळी घरात झाेपून असलेले शालिक आणि त्यांची पत्नी शाळू दबले गेले. ही माहिती गावकऱ्यांना हाेताच त्यांनी धाव घेतली. सरपंच रवी आरीकर व गावकऱ्यांनी प्रयत्न करुन घरात दबलेल्या पती-पत्नीला बाहेर काढले. त्यांना तात्काळ काेंढा येथील प्राथमिक आराेग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्यांना भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
गत दाेन दिवसांपासून अड्याळ परिसरात पाऊस काेसळत असून, यामुळे बारसागडे यांचे घर काेसळले. गावकऱ्यांनी तात्काळ धाव घेतल्याने या दाेघांचेही प्राण वाचले. घरातील सर्व साहित्य मातीमाेल झाले असून, नुकसानभरपाई देण्याची मागणी करण्यात आली आहे.