मांगलीत शेतकऱ्यांचे आमरण उपोषण

By Admin | Updated: December 6, 2015 00:32 IST2015-12-06T00:32:47+5:302015-12-06T00:32:47+5:30

तालुक्यातील मांगली (बांध) व परिसरातील २१ गावातील पिडीत शेतकऱ्यांच्या सहकार्याने गावातील सरपंच, उपसरपंच, प्रगत शेतकरी ...

The hunger strike of demanding farmers | मांगलीत शेतकऱ्यांचे आमरण उपोषण

मांगलीत शेतकऱ्यांचे आमरण उपोषण

२१ गावांतील सरपंचाचा पुढाकार : दुष्काळ घोषित करून कर्जमाफीची मागणी
लाखनी : तालुक्यातील मांगली (बांध) व परिसरातील २१ गावातील पिडीत शेतकऱ्यांच्या सहकार्याने गावातील सरपंच, उपसरपंच, प्रगत शेतकरी आणि ज्येष्ठ नागरिकांच्या नेतृत्वात आजपासून १० शेतकऱ्यांनी आमरण उपोषणाला विविध मागण्या पूर्ण करण्यासाठी प्रारंभ केला आहे.
उपोषण मंडपाला जिल्हा परिषद सभापती विनायक बुरडे, पं.स. उपसभापती विजय कापसे, सुनिल गिऱ्हेपुंजे, पं.स. सदस्य खुशाल गिदमारे यांनी भेट देऊन उपोषणाला पाठिंबा दिला आहे. मांगली (बांध) परिसरातील किटाडी, मांगली, केसलवाडा, मचारणा, न्याहारवाणी, गुरढा, ढिवरखेडा, मेंगापूर, खैरी, पहाडी, खराशी, रेंगोडा, कनेरी, गोंडेगाव, निमगाव, देवरी, जेवनाळा, कवडशी, हमेशा, मुरमाडी अशा २१ गावातील शेतकऱ्यांच्या शेतातील धानपिकांवर अनेक रोगांनी व किडीच्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण धानपिक नष्ट होऊन उत्पन्न मिळाले नाही. परिसरातील शेतकरी हवालदिल झाला आहे. राष्ट्रीय बँक, सोसायटी व खासगी सावकारांकडून घेतलेले कर्जफेड करणे शेतकऱ्यांना शक्य नाही. त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेऊन उपोषणकर्त्यांनी निवेदनाच्या माध्यमातून मागण्या समोर ठेवल्या आहे. यात आणेवारी जाहीर करावी, पाच एकरच्या वरील शेतकऱ्यांचे थकीत कर्ज माफ करावे, परिसरात दुष्काळ जाहीर करावा, रोहयो कामे त्वरीत सुरु करावे, सन २०१३-१४ च्या ओल्या दुष्काळाची थकबाकी अनुदान त्वरीत द्यावा अशा मागण्यांचा समावेश आहे. निवेदन प्रगत शेतकरी मोहन खोब्रागडे यांच्या नेतृत्वात बाबूराव ठवकर, ज्ञानेश्वर मोहतुरे, घनश्याम धरमसारे, भाऊराव फटे, प्रमिला मडावी, पुरुषोत्तम सेलोकर, पुरणदास बडोले, भोजराम राऊत, मोहन झलके अशा १० शेतकऱ्यांनी सरपंच जितेंद्र बोरकर, नरेश गरपडे, गिरीधारी भांडारकर, जतमाला राघोर्ते, प्रशांत मासूरकर, बारसराव गरपडे, दिपक राहटे, प्रमोद राहटे, पुरुषोत्तम पुस्तोडे यांनी उपोषणात सहभाग दिला. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: The hunger strike of demanding farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.