मायक्रोफायनान्स कार्यालयाला घातला शेकडो महिलांनी घेराव

By Admin | Updated: March 1, 2017 00:28 IST2017-03-01T00:28:19+5:302017-03-01T00:28:19+5:30

येथील मायक्रोफायनान्स कंपनीच्या कार्यालयावर तुमसर तालुक्यातील शेकडो महिलांनी मंगळवारला धडक मोर्चा काढून व्यवस्थापकांना घेराव घातला.

Hundreds of women engage in microfinance office | मायक्रोफायनान्स कार्यालयाला घातला शेकडो महिलांनी घेराव

मायक्रोफायनान्स कार्यालयाला घातला शेकडो महिलांनी घेराव

तुमसरातील प्रकार : स्वाभिमानी शेतकरी संघटनेने घेतला पुढाकार
तुमसर : येथील मायक्रोफायनान्स कंपनीच्या कार्यालयावर तुमसर तालुक्यातील शेकडो महिलांनी मंगळवारला धडक मोर्चा काढून व्यवस्थापकांना घेराव घातला. कर्ज घेतलेल्या महिलांकडे नगदी रक्कम भरण्याची स्थिती नाही. शासनाने कर्जमाफी देऊन मायक्रोफायनान्सच्या तावडीतून सुटका करण्याची मागणी पीडित महिलांनी केली.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वात मायक्रोफायनान्स कंपनीच्या कार्यालयावर शेकडो महिलांनी धडक देऊन व्यवस्थापकांना घेराव घातला. शहरातील प्रमुख मार्गाने ग्रामीण परिसरातील शेकडो महिला तुमसरात दाखल झाल्या होत्या. महिला बचत गटाद्वारे पतपुरवठा करून साप्ताहिक, पंधरवाडा, मासिक वसुलीसह व्याज आकारून महिलांना धमकाविण्याचा प्रकार मायक्रोफायनान्सकडून सुरु आहे.
कर्ज घेणाऱ्या सदस्यांच्या घरी रात्री पैशाचा तगादा लावण्यात येत आहे. यामुळे महिलांत सध्या भीतीचे वातावरण आहे. व्यवसायीकांच्या पाशातून स्त्री शक्तीची मुक्तता करण्यास शासनाने हस्तक्षेप करून अवैध कर्ज माफ करण्याची मागणी स्वाभीमानी शेतकरी संघटनेने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
मार्च महिन्यात राज्याचे कृषी व पणन मंत्री सदाभाऊ खोत, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष खासदार राजू शेट्टी तथा वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष रविकांत तुपकर येणार आहेत. तेव्हा भंडारा जिल्ह्यातील हजारो महिलांचा मेळाव्यात कर्जबाजारी महिला आपल्या व्यथा मांडणार असल्याचे जिल्हाध्यक्ष राकेश चोपकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
मायक्रोफायनान्स कंपनीने ग्रामीण भागात नेटवर्क तयार करून कर्ज वाटप केले. याची माहिती प्रशासनाला नव्हती काय? होती तर त्यांनी याची दखल का घेतली नाही. असा प्रश्न उपस्थित करून ३५ टक्के व्याजाने रक्कम कशी कर्ज म्हणून देण्यात येईल. यासंदर्भात पुढील कारवाई करण्यात येईल, असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राकेश चोपकर, सचिव सेलोकर यांनी सांगितले. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Hundreds of women engage in microfinance office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.