नियोजनाअभावी शेकडो हेक्टर शेती सिंचनाविना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2020 05:00 IST2020-06-22T05:00:00+5:302020-06-22T05:00:21+5:30
अनेक वर्षांपासून अड्याळ व परिसरातील शेकडो शेतकऱ्यांच्या शेतात नेरला उपसा सिंचनाचे पाणी मिळेल असे स्वप्न बघितले होते. उपसा सिंचन योजनेचा लाभ अनेक शेतकऱ्यांना मिळाला आहे. परंतु या संदर्भीत अनेक प्रश्न अजूनही आवासून उभे आहेत. सालेवाडा, अड्याळ- विरली खंदारचे बाजुने गेलेल्या नेरला उपसासिंचनाची मुख्य वितरण नलिकेच्या मार्गात दरवाजे नाहीत. बऱ्याच ठिकाणी शाखा कालवे अद्यापही तयार झाले नाही.

नियोजनाअभावी शेकडो हेक्टर शेती सिंचनाविना
विशाल रणदिवे।
लोकमत न्यूज नेटवर्क
अड्याळ : पवनी तालुक्यातील गोसे धरणानंतर महत्वाकांक्षी प्रकल्प म्हणून नेरला उपसा सिंचन प्रकल्पाकडे बघीतले जाते. मात्र कालव्यावरील सदोष नियोजनामुळे वस्तुस्थितीत परिसरातील शेकडो हेक्टर शेतजमीन आजही सिंचनाविना आहेत. जिथे गेट व जलवाहिनीची गरज असताना तिथेच ती सुविधा नसल्याने कालव्याचा उपयोग तरी काय असा प्रश्न शेतकरी उपस्थित करीत आहेत.
अनेक वर्षांपासून अड्याळ व परिसरातील शेकडो शेतकऱ्यांच्या शेतात नेरला उपसा सिंचनाचे पाणी मिळेल असे स्वप्न बघितले होते. उपसा सिंचन योजनेचा लाभ अनेक शेतकऱ्यांना मिळाला आहे. परंतु या संदर्भीत अनेक प्रश्न अजूनही आवासून उभे आहेत. सालेवाडा, अड्याळ- विरली खंदारचे बाजुने गेलेल्या नेरला उपसासिंचनाची मुख्य वितरण नलिकेच्या मार्गात दरवाजे नाहीत. बऱ्याच ठिकाणी शाखा कालवे अद्यापही तयार झाले नाही. परिणामत: शेकडो हेक्टर जमिनीला सिंचन मिळू शकले नाही. ज्या ठिकाणी कालव्यावर दरवाजे हवेत तिथे बांधकामच न झाल्याने तो परिसर सिंचनाविना आहे. अशा ठिकाणी शेतकऱ्यांच्या सुविधांसाठी जलवाहिनी किंवा शाखा कालवे निर्माण करण्याची गरज आहे.
शाखा कालवे नादुरुस्त
नेरला उपसा सिंचनावरील मुख्य वितरण नलिकेला जोडलेल्या शाखा कालव्यांची अवस्था अत्यंत बिकट आहे. काही ठिकाणी कालवे तुटफूट झाले असून काही ठिकाणी जलवाहिनी जमीनदोस्त झाली आहे. शेतातील पीक वाचविण्यासाठी पाणी बाहेर फेकावे लागते.