अन् स्वच्छतेसाठी सरसावले शेकडो हात
By Admin | Updated: January 25, 2016 00:42 IST2016-01-25T00:42:24+5:302016-01-25T00:42:24+5:30
मनात जिद्द असले की, कुठलीही बाब अशक्य नाही, अशाच विचार सरणीला वेग देत आज रविवारी सकाळी शेकडो हातांची शक्ती स्वच्छता अभियानासाठी सरसावली.

अन् स्वच्छतेसाठी सरसावले शेकडो हात
दोन तासात पालटले रुप जिल्हा प्रशासन, नगर पालिका ग्रीन माईण्ड्स संघटनेचा संयुक्त उपक्रम
ुुइंद्रपाल कटकवार भंडारा
मनात जिद्द असले की, कुठलीही बाब अशक्य नाही, अशाच विचार सरणीला वेग देत आज रविवारी सकाळी शेकडो हातांची शक्ती स्वच्छता अभियानासाठी सरसावली. स्वच्छता असली की, सुसंस्कृतपणा आपोआप येतो, ही कल्पना स्वच्छतेच्या उपक्रमातून दाखवून देण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील अस्वच्छता अवघ्या दोन तासात बाळगलेल्या जिल्हा प्रशासन व सामाजिक संघटनेने दुर केली.
या स्वच्छता उपक्रमासाठी जिल्हाधिकारी कार्यालय, नगरपालिका, नगरपालिकेचा स्वच्छता विभाग व ग्रीन माईण्ड्स संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला. विशेष म्हणजे जिल्हाधिकारी धीरजकुमार, निवासी उपजिल्हाधिकारी विजया बनकर, पालिकेचे मुख्याधिकारी रविंद्र देवतळे यांनी कार्याला हातभार लावला. सकाळी ९ वाजतापासून जिल्हाधिकारी कार्यालय परिसराचा समोरुन बाजूचे स्वच्छता करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला. यात संजय एकापुरे यांच्या सहकार्याने मिळालेल्या जेसीबीच्या सहायाने रस्त्याच्या कडेला असलेले मातीचे ठिगारे काढण्यात आले. प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावरील केरकचरा दीड तासात साफ केला. तसेच सुरक्षा भिंतीवर रंगरंगोटी करुन पाणी वाचवा - पाणी जिरवा, बेटी बचाओ - बेटी पढाओ, स्वच्छता ठेवा, झाडे वाचवा आदी नैसर्गिक संदेशही चित्राच्या माध्यमातून रेखाटण्यात आले. यावेळी विकास मदनकर, आशिष मोहबे, शैलेंद्र श्रीवास्तव, रवि नशिने, नितीन कुथे, विशाल गुल्हाणे, देवेंद्र गभणे, रंजित उजवणे, संध्या किरोलीकर, प्रतिमा काबरा, मयुर गायधने, विजया काबरा, इंद्रायणी वासनिक, जया काबरा, रिना पशिने, इंदिरा काबरा, संगीता चौधरी, दीपा काकडे, नीलिमा मैने, सुरेखा मडामे, साधना त्रिवेदी, परी पशिने, आर्या वासनिक यांच्यासह नगर पालिकेचे स्वच्छता कर्मचाऱ्यांनी उपक्रमात उपस्थिती दर्शविली.
जिल्हाधिकारी बंगल्यामागील अस्वच्छता कायम
जिल्हाधिकारी कार्यालय परिसर आज शेकडो लोकांच्या मदतीने स्वच्छ करण्यात आला. मात्र जिल्हाधिकारी राहतात त्या शिवनेरी बंगल्यामागील अस्वच्छतेचा विळखा मागील कित्येक वर्षांपासून कायम आहे. बंगल्यामागील नाली व समोरील कचरा उचलण्यात आलेला नाही. वळणावर नादुरुस्त मुत्रीघर असून दुर्गंधीमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. या समस्येकडेही कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी तथा संघटनेचे लक्ष जाणार काय?